breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापाैर ह्या आमदारांच्या ‘रिमोट कंट्रोल’वर चालतात – राहूल कलाटे

पिंपरी-चिंचवडकरांवर करवाढ लागू केल्यानंतरही मला बोलू दिले नाही, गटनेत्यांचा गंभीर आरोप

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड शहरातील जनतेवर सत्ताधारी भाजपने करवाढ लागू करण्याला छुपा पाठिंबा दिला आहे. कर योग्य मुल्यात 1700 रुपयावरुन तब्बल 11 हजारांवर लादला जाणार आहे. त्याला शिवसेनेच्या गटनेता म्हणून माझा विरोध असणार आहे. परंतू, महापाैरांनी मी हात वरती करुन मला जाणूनबुजून बोलू दिले नाही. राजकीय द्वेषापोटी महापाैर सभाशास्त्रांचे नियम पायदळी तूडवून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुळात हे सभागृह महापाैर माई ढोरे चालवित नसून आमदार लक्ष्मण जगतापच चालवित आहेत. त्यामुळे महापाैर ह्या आमदारांच्या रिमोट कंट्रोलवर चालतात, असा गंभीर आरोप शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी पत्रकार परिषदेत केला.

पिंपरी चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब महासभा आज (बुधवारी) पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापाैर उषा ढोरे होत्या. या महासभेत शहरवासियांवर कर योग्य मुल्य प्रस्तावाला भाजपने मंजुरी दिल्याने विरोधकांनी विरोध दर्शविला. मात्र, त्या प्रस्तावावर शिवसेना गटनेत्यांना बोलण्यास मज्जाव करण्यात आल्याने त्यांनी सभागृहात ग्लास आपटून सत्ताधा-याचा निषेध व्यक्त केला. तसेच महापाैर दादागिरी खपवून घेणार नसल्याचे म्हटले आहे.

कलाटे म्हणाले की, महापाैर ह्या महिला असल्याचा गैरफायदा घेत आहे. तसेच चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सांगण्यावरुन राजकीय हेतूपुरस्कृत ते माझ्याशी वागत आहेत. मला बोलू दिले नाही म्हणून मी ग्लास खालीच आपटून निषेध व्यक्त केला. तसेच खोटे व चुकीचे आरोप करुन महापाैर बनाव करीत आहेत. एखादा विषयावर महापाैर दादागिरी करुन मंजूर करु लागल्या आहेत., असेही त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button