breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

धक्कादायक! तिने अनफॉलो केल्याने तो संतापला; पॉर्न वेबसाईटवर फोटो अपलोड करण्याची दिली धमकी

नवी दिल्ली |

सध्या सोशल नेटवर्किंग हा अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. एक खरं आयुष्य इतकच महत्व या व्ह्यर्चूअल जगातील आयुष्यालाही आलं आहे. अनेकजण हे वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग माध्यमांमधून व्यक्त होत असतात. मात्र त्याचवेळी सोशल नेटवर्किंगचा दुरुपयोगही केला जात असल्याचे प्रकार समोर येत आहे. एकतर्फी प्रेम असो किंवा कोणावर तरी लक्ष ठेवणं असो सोशल नेटवर्किंगचा चुकीच्या पद्धतीने वापर करणाऱ्यांची संख्याही कमी नाहीय. असाच एक प्रकार गुजरातमधील अहमदाबाद शहरातील कृष्णानंगर परिसरात घडला आहे. एका मुलीने इन्स्टाग्राम अनफॉलो केल्याने येथील एका तरुणाने तिला थेट बदनाम करण्याची धमकी दिलीय.

कृष्णानगर येथे राहणाऱ्या एका तरुणीने सायबर गुन्ह्यांसंदर्भातील पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. या मुलीने दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये इन्स्टाग्रामवर एका मुलाने तिला फॉलो केल्यासंदर्भातील नोटीफिकेशन आलं होतं. या मुलीने ही रिक्वेस्ट स्वीकारुन या मुलाला फॉलो बॅकही केलं. त्यानंतर हा मुलगा अनेकदा या मुलीला मेसेज करुन त्रास देऊ लागला. अखेर या मुलीने या सततच्या त्राला कंटाळून या मुलाला अनफॉलो केलं. मात्र या मुलीने त्याला अनफॉलो केल्यानंतर त्याने तिला अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. अश्लील भाषेतील मेसेज करण्याबरोबरच या मुलाने मुलीला धमक्याही दिल्या. जर तू माझ्याशी बोलणं बंद केलं तर मी तुझा आणि तुझ्या चुलत बहिणीचा फोटो फॉर्म करुन पॉर्न वेबसाईटवर व्हायरल करेल अशी धमकी या मुलाने मुलीला दिल्याचं तक्रारीमध्ये म्हटलं आहे. आपण काय करु शकतो हे दाखवण्यासाठी या मुलाने पॉर्न बेवसाईटवरील काही फोटो डाऊनलोड करुन त्यावर या मुलीचा आणि तिच्या बहिणीचा फोटो लावून तिला इन्टाग्रामवर पाठवले होते. त्याने अनेकदा या मुलीला असे फोटो पाठवल्यानंतर या मुलीने अखेर पोलिसांकडे जाऊन या मुलाविरोधात तक्रार केलीय. या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून ते पुढील तपास करत आहेत.

वाचा- PPF वरील व्याजदर जैसे थे: तो आदेश चुकून निघाला- अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button