breaking-newsराष्ट्रिय

पेट्रोल दराबाबत दिग्विजय सिंह यांनी वर्तवले भाकित

भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. दिग्विजय सिंह 6 महिन्यांच्या नर्मदा परिक्रमेवरून परतल्यानंतर त्यांनी पेट्रोल-डिझेलच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. ट्विट करत ते म्हणाले, देशभरात पेट्रोल-डिझेलची भाव भडकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत देशभरात भाजपाचे राज्य असेलली सरकारे बॅकफूटवर गेली आहेत.

2014 ते 2018 दरम्यान मोदी सरकारनं मोठ्या प्रमाणात एक्साइज ड्युटी वाढवली आहे. त्यामुळे मोदी सरकार 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरची एक्साइज ड्युटी 18.28 रुपयांनी, तर डिझेलवरची एक्साइज ड्युटी 19.87 रुपये कमी करून मतदारांना आकर्षित करू शकते. तसेच पायाभूत सुविधांच्या विकासाच्या नावाखाली 8 रुपये प्रतिलिटर सेस वेगळा लावण्यात येत आहे, असेही दिग्विजय सिंह म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. विशेष म्हणजे त्यावेळी दिग्विजय सिंह यांनी जो फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये शिवी लिहिण्यात आली होती.

digvijaya singh

@digvijaya_28

Least GOI and Modiji can do is to reduce Central Excise Duty to the level of May 2014 which would bring the price of Petrol by Rs 18.28/ litre and Diesel by Rs 19.87/litre. They won’t do it today but probably they would do it in February 2019 2 months before LS polls.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button