breaking-newsताज्या घडामोडी

धक्कादायक! ‘फक्त टॉवेल लावून शिकवायचे’; शिक्षकावर विद्यार्थ्यांनी केला लैंगिक छळाचा आरोप

नवी दिल्ली |

चेन्नईतील एका नामांकित शाळेच्या शिक्षकावर लैंगिक छळ केल्याच्या अनेक तक्रारी रविवारी समोर आल्या. पोलिसांनी या प्रकरणाबाबत चौकशी केली असता अनेक विद्यार्थ्यांनी या शिक्षकाबाबत तक्रार केली होती. त्यानंतर या शिक्षकाला निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी या संदर्भात तपास सुरु केला आहे. शाळेच्या एका माजी विद्यार्थ्यीनीने शिक्षकावर लावलेले आरोप तिच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. त्यानंतर तिने ज्यासोबत असा काही प्रसंग घडला आहे त्यांना पुढे येण्यास सांगितले होते. त्यानंतर अनेक विद्यार्थिनींनी पुढे येऊन आपल्या तक्रारी मांडल्या. राजगोपालन नावाचा शिक्षक फक्त टॉवेल गुंडाळून ऑनलाईन वर्गात शिकवतो असा आरोप त्यांनी केला आहे. त्यादरम्यान काही विद्यार्थ्यांना तो व्हेरी क्युट असा मेसेज पाठवत असत. तसेच त्यांच्या प्रोफाईल फोटोवर कमेन्टं देखील करत असत. अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.

एका विद्यार्थीनीने त्या शिक्षकाच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये शिक्षक तिला चित्रपट पाहायला जाण्यासाठी विचारत आहे. त्या मुलीने विरोध केल्यानंतर त्याने तो मेसेज डिलीट केला. एका विद्यार्थीनीने त्या शिक्षकाने अश्लील चित्रपटाची एक लिंक त्यांच्या ग्रुपवर पाठवल्याचे सांगितले. रात्री उशिरा व्हिडिओ कॉलवर येण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज केल्याचा आरोपही विद्यार्थीनींनी केला आहे. विद्यार्थ्यांसोबत या शिक्षकांचे व्हाट्सएप मेसेजचे अनेक स्क्रीनशॉट्स व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनाकडे अनेक तक्रारी केल्या. त्यावर व्यवस्थापनाने त्या शिक्षकाविरुद्ध कारवाई करण्यास नकार दिला असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. “व्यवस्थापनाकडे यासंदर्भात कोणतीही तक्रार नोंदविली गेली नव्हती. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम करणार्‍या कोणत्याही अयोग्य वर्तनाबद्दल व्यवस्थापनाकडून कारवाई करण्यात येईल,” असे मुख्याध्यापक व शाळेच्या संस्थेने पालकांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

शिक्षकावरील आरोपांना उत्तर देण्यासाठी शाळेला सांगण्यात आल्याचे तामिळनाडूचे शिक्षणमंत्री अनबिल महेश यांनी सांगितले. शाळेने या सर्व आरोपांची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमणी आहे. जर तो शिक्षक दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई करणार येणार असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले. द्रमुकच्या खासदार कनिमोझी यांनी देखील यासंदर्भात ट्वीट केले आहे. “चेन्नईच्या एका शाळेत एका शिक्षिकेने लैंगिक छळ केल्याचा आरोप धक्कादायक आहे. यासंदर्भात चौकशी केली पाहिजे आणि विद्यार्थ्यांकडून आलेल्या तक्रारींविरूद्ध कारवाई करण्यात अयशस्वी ठरलेल्या शालेय अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणे आवश्यक आहे,” असे कनिमोझी यांनी म्हटले आहे. या संदर्भात शाळेच्या एक हजाराहून अधिक माजी विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी केलेले निवेदन शालेय व्यवस्थापनाला देण्यात आलं आहे. माजी विद्यार्थ्यांनी त्या शिक्षकांला त्वरित निलंबित करावे अन्यथा कोणताही वर्ग सुरु करु नका अशी मागणी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button