breaking-newsताज्या घडामोडी

नागपुरातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा चारवर

नागपूर |महाईन्यूज |

जगभरात थैमान घातलेला करोना आता विदर्भातही धडकला आहे. नागपुरात शुक्रवारी कोरोनाचे दोन रुग्ण सापडले तर , शनिवारी म्हणजे आज आणखी एकाला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्याच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.आता आणखी एका रुग्णाचे नमुने पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल मिळाला आहे.त्यामुळे नागपुरातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा चारवर पोहोचला आहे. नागपूरमध्येही भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या सात देशांमधून प्रवास केलेल्यांना विलग करण्यात यावे, अशी सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. या सूचनेनुसार, या सात देशांतून आलेल्या व येणाऱ्या प्रवाशांचे १०० टक्के विलगीकरण करण्यात येत आहे. या देशातून १५ फेब्रुवारीनंतर ज्यांनी प्रवास केला आहे आणि ते देशात परतले आहेत, त्यांना सक्तीने १४ दिवस घरीच स्वतंत्र राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेल्या शहरांमध्ये विलगीकरणाची सुविधा तातडीने निर्माण करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. या सूचनेनुसार नागपुरात आमदार निवास येथील विंग-२ येथे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button