breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘पाच पक्ष बदलणारा आणि जनतेला वेळ न देणारा खासदार नको’; आढळराव पाटलांची खासदार कोल्हेंवर टीका

पुणे | लोकसभेचे रणांगण तापत असताना आता प्रचाराला देखील रंगत येताना पाहायला मिळत आहे. आरोप आणि प्रत्यारोपाच्या फैरी वाढल्या आहेत. शिरूर लोकसभेत देखील हेच चित्र पाहायला मिळत आहे. जनतेला वेळ न देणारा आणि पाच पक्ष बदलून आलेला खासदार नको, असं म्हणत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली आहे. लोकसभेच्या प्रचारानिमित्त बोलताना आढळराव पाटील यांनी ही टीका केली आहे.

शिरूर लोकसभेत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून जोरदार प्रचाराला सुरूवात झाली आहे. खासदार कोल्हे यांना पराभूत करण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधला आहेच. मात्र गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील देखील शड्डू ठोकून तयार आहेत.

दोन्ही उमेदवारांसाठी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडून प्रचाराचे रान उठविले जात आहे. तर उमेदवारही विरोधकांवर शरसंधान साधताना दिसत आहेत. त्याचाच एक पट शिरूर लोकसभेत पाहायला मिळाला. गेल्या पाच वर्षात निवडून आल्यानंतर जनतेमध्ये आपला जनसंपर्क कायम ठेवण्यात खासदार अमोल कोल्हे यांना अपयश आले आहे. त्यामुळे मतदारसंघात त्यांच्याविषयी नाराजीचा सूर आहे.

हेही वाचा    –    मोदींना सामाजिक भान नाही, अर्थव्यवस्थेतलं काही कळत नाही; ठाकरे गटाचा हल्लाबोल 

हाच धागा पकडता शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोल्हे यांच्यावर टीका केली. आढळराव पाटील म्हणाले की, गेल्या पाच वर्षात खासदार नसलेला लोकसभा मतदारसंघ अशी शिरूरची ओळख झाली आहे. जनतेला वेळ न देणारा आणि पाच पक्ष बदलणारा नाटककार यांच्यापासून सावध राहा, अशी टीका शिरूरचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी केली. निवडून आल्यापासून पाच वर्षात मतदारसंघात लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही. जनका दरबार घेऊ, सर्व मतदारसंघात प्रचार कार्यालय सुरू करू अशा राजकीय वलग्रा केल्या. मात्र त्यांच्यापासून निराशा मिळाली असल्याचे आढळराव पाटील म्हणाले.

खासदार अमोल कोल्हेंचे मौनच

आढळराव पाटील यांनी केलेल्या टीकेला खासदार अमोल कोल्हे प्रत्युत्तर देऊ शकले नाहीत. आढळरावांच्या टीकेवर माध्यमांनी अमोल कोल्हे यांना प्रतिक्रिया विचारली असता नो कमेंट्स म्हणत त्यांनी या प्रकारावर बोलणे टाळले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button