breaking-newsपिंपरी / चिंचवड

एकवीरा गडावर मावळ प्रशासनाकडून स्वच्छता अभियान

  • मतदार नोंदणीसाठी जनजागृती

कार्ला – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या एकवीरा देवी नवरात्री उत्सवास आजपासून सुरवात होत आहे. या पार्श्‍वभूमीवर मावळचे तहसिलदार रणजित देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली एकवीरा देवी गडावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

एकवीरा देवस्थानचा ट्रस्टीमध्ये असलेल्या वादळामुळे मावळ प्रशासकीय समितीकडे या नवरात्र उत्सवाचे नियोजन देण्यात आले आहे. यामुळे नवरात्रीपूर्वी एकवीरा परिसर स्वच्छ ठेवावा, या उद्देशाने देसाई यांनी तहसिल प्रशासन यंत्रणा, परिसरातील सर्व पोलीस पाटील, तलाठी, कोतवाल, स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, सर्व कर्मचारी यांना बरोबर घेऊन स्वच्छता अभियान राबवण्यात आले. स्वच्छतेबद्दल शपथ घेण्यात आली. तसेच सर्व दुकानदार यांना आप आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन देखील करण्यात आले.

स्वच्छता अभियाना बरोबरच एकवीरा देवी दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये मतदार नोंदणी जनजागृती देखील करण्यात आली. या वेळी नायब तहसीलदार सुनंदा भोसले, वेहरगाव-दहिवली सरपंच दत्तात्रय पडवळ, कार्ला मंडल अधिकारी माणिक साबळे, मेहबूब शेख, संदीप बोरकर, मावळ पोलीस पाटील संघटना अध्यक्ष संजय जाधव, शिवसेना मावळ संघटक सुरेश गायकवाड, देवस्थानचे विश्‍वस्त विजय देशमुख, वेहरगाव पोलीस पाटील अनिल पडवळ, तंटामुक्‍ती अध्यक्ष मधुकर पडवळ, संतोष रसाळ, ऍड. जयवंत देशमुख, तलाठी सूर्यवंशी भाऊसाहेब, शहाजान इनामदार, राहुल आंबेकर, गणेश हुलावळे यांच्यासह परिसरातील सर्व तलाठी, पोलीस पाटील, वेहरगाव ग्रामस्थांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.


Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button