breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवनाथडी जत्रेसाठी महिलांना मुलभूत सोयी-सुविधा द्या – विरोधी पक्षनेते दत्ता साने

विरोधी पक्षनेत्यांचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र 

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणास महानगरपालिकेच्या माध्यमातून पवनाथडी जत्रा भरविली जाते, या चार दिवसीय पवनाथडी जत्रेला शहरातील लाखो महिला, मुलीसह नागरिक भेट देत असतात. त्यामुळे पवनाथडी जत्रेसाठी महापालिकेने सोयी-सुविधा देण्यात याव्यात, जेणे करुन शहरवासियांची गैरसोय होवू नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की,  महापालिकेच्या नागरवस्ती व महिला बालकल्याण विभागाकडून शहरातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवित आहे. यामध्ये महिला व बालकल्याण योजनेतून महिला बचत गटासाठी महापालिका दरवर्षी पवनाथडी जत्रेचे आयोजन करत असते. शहरातील महिला बचत गटांतील महिलांना मोफत स्टॉल वाटप करुन महिला बचत गटामार्फत उत्पादित केलेल्या मालास बाजारपेठ उपलब्ध करुन त्यांना स्वंयरोजगाराचे साधन उपलब्ध करुन दिले जाते.

यंदा पवनाथडी जत्रेचे आयोजन दि. ४ ते ७ जानेवारी दरम्यान करण्यात आलेले आहे.  या पवनाथडी जत्रेमध्ये बहुतांश महिलांचा सहभाग असल्यामुळे महिला स्वच्छतागृहाची पुरेशी व्यवस्था असणे गरजेचे आहे. परंतु महिलांसाठी स्वच्छता गृहे पुरेशी नसतात व असलेली स्वच्छतागृहे वेळोवेळी स्वच्छ केली जात नाहीत. त्यामुळे पवनाथडी मध्ये आलेल्या महिलांची कुचंबणा होते. तसेच  पुरेश्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था नसते त्यामुळे महिलांची छेडछाड, साखळी, पर्स हिसकावणे असे प्रकार दरवर्षी घडतात. त्यामुळे सर्वसामान्य महिलांना आर्थिक भुर्दड बसतो. तसेच वाटप केलेले स्टॉलही छोटे असतात. त्यामुळे सदर महिलांना त्यांचा व्यवसाय करण्याच्या दृष्टीने गैरसोईचे होते.

त्यामुळे पवनाथडी जत्रेच्या ठिकाणी महिलांसाठी पुरेसे व स्वच्छ स्वच्छतागृह, पुरेसे आकाराचे स्टॉल, मनपाची सुरक्षा व पोलिस सुरक्षा तसेच आपतकालिन परीस्थितीत तातडीची मदत म्हणून मनपाची रुग्णवाहिका व अग्निशामक दलाचा बंब ठेवण्यात यावा, अशी मागणी साने यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button