breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

आढळराव पाटलांचा आज अजित पवार गटात पक्षप्रवेश, पक्षप्रवेशापूर्वी महत्वाची प्रतिक्रिया

पिंपरी | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. महायुतीमध्ये शिरूर लोकसभेची जागा ही राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे या जागेवरून निवडणूक लढण्यासाठी आढळराव पाटील आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. पक्षप्रवेशापूर्वी त्यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, अमोल कोल्हे हे २०१९ मध्ये शिवसेनेकडून राष्ट्रवादीमध्ये गेले. ती त्यांची बेडूक उडी होती. पण आता मी तिन्ही पक्षाकडून सहमतीने राष्ट्रावादीमध्ये प्रवेश करत आहे. यात मोठा फरक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सागितलं की, महायुतीमधून राष्ट्रवादीमधून लढा..मी तयार झालो. आता मी महायुतीचा उमेदवार आहे. मी पक्ष बदलला आहे. पण याचा अर्थ गद्दारी केली असा नाही. २०१९ ला कोल्हेंनी मारलेली बेडूक उडी आणि २०२४ मी राष्ट्रवादीत करत असलेला प्रवेश..यात फरक आहे.

हेही वाचा   –     राजकीय सभांवर कोट्यावधींचा खर्च, त्याचं काय? इंदुरीकर महाराजांचा सवाल

गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या प्रवेशाची चर्चा आहे. ही जागा महायुतीमध्ये कोणाकडे जातेय. यासाठी हा हा विषय रखडला होता. मात्र आता स्पष्ट झालंय की, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जातेय. म्हणून तिन्ही पक्षाचा सहमातीचा उमेदवार म्हणून माझी निवड झाली आहे. त्याचाच भाग म्हणून माझा आजचा प्रवेश होत आहेमागच्या निवडणुकीत आमदार पेक्षा जनता माझ्या सोबत राहिली आहे. यावेळची परिस्थिती वेगळी आहे. शिरूरमध्ये माझ्या पाठीमागे पाच आमदार आहेत. अजित पवार यांची ताकत माझ्या पाठीशी उभी आहे. त्यामुळे ही निवडणूक महायुती, असं शिवाजीराव आढराव पाटील म्हणाले.

आज मी तिन्ही पक्षाच्या संगनमताने आज माझा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे. मला शिवसेनेची परवानगी की, महायुतीमधील राष्ट्रवादी पक्षामधून निवडणूक लढवावी, असं तिन्ही पक्षांचं ठरलं आहे. पाच आमदार माझ्या सोबत आहे. अजित पवार आणि तिन्ही पक्ष यात समनवयक साधून प्रचार करणार आहेत. आज उमेदवारी जाहीर असून माझा प्रवेश होतोय. आज उमेदवारी जाहीर होईल किंवा नाही. मात्र मीच महायुतीचा उमेदवार असणार आहे, असंही आढळराव पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button