breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘या’ चित्रपटावर मिळणार खास ऑफर!

The Vaccine War : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला आहे. मात्र आता गांधी जयंतीनिमित्त अग्निहोत्रींनी या सिनेमाची खास ऑफर ठेवली आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी ‘द व्हॅक्सिन वॉर’ या सिनेमाची एका तिकीटावर एक तिकिट फ्री अशी ऑफर ठेवली आहे. यासंदर्भात अग्निहोत्रींनी ट्वीट करत माहिती दिली आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’ या सिनेमात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, रायमा सेन, अनुपम खेर, गिरिजा ओक, निवेदिता भट्टाचार्य, सप्तमी गौडा आणि मोहन कपूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

हेही वाचा – डीजेच्या दणदणाटावरून राज ठाकरेंचा संताप; म्हणाले..

विवेक अग्निहोत्रीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली अशा दहा भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button