breaking-newsपुणे

शिवराज्याभिषेकावरील स्ट्रिंग चित्राची ‘एशिया बुक’मध्ये दखल

  • युवा कलाकार राहुल ठाकरे याचा गौरव

तब्बल दहा किलो म्हणजे ४२ हजार ८१० खिळ्यांचा वापर करून पाच महिन्यांत ‘शिवराज्याभिषेक’ या विषयावर साकारलेल्या स्ट्रिंग चित्राची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये दखल घेण्यात आली आहे. चित्रकलेची कोणतीही पाश्र्वभूमी नसताना हे चित्र साकारणारा युवा कलाकार राहुल ठाकरे याचा गौरव झाला आहे.

शिवराज्याभिषेकाची अनेक कलाकारांनी साकारलेली चित्रे अनेकांनी पाहिली असतील. पण, राहुल याने ‘स्ट्रिंग आर्ट’ या माध्यमात हे अनोखे चित्र साकारले आहे. दहा किलो खिळ्यांचा वापर करून राहुलने पाच महिन्यांत ७२० तास काम करून ८ फूट लांबीच्या आणि ४ फूट रूंदीच्या प्लायवूडवर हे चित्र साकारले आहे. या चित्राची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये दखल घेतली गेली आहे. यापूर्वी २८ हजार खिळ्यांचा वापर करून साकारलेल्या चित्राची नोंद होती. त्यामुळे ४२ हजार खिळ्यांचा वापर करून केलेल्या मोठय़ा आकारातील या चित्राची नोंद झाली आहे.

आता लवकरच या चित्राची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राहुल ठाकरे याने सांगितले. मूळचा गोंदिया जिल्ह्य़ातील राहुल पदव्युत्तर शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button