ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

गाफील राहू नका; उद्याच निवडणूक असल्याचे समजून कामाला लागा : खासदार श्रीरंग बारणे

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा काळेवाडीत पदाधिकारी मेळावा

पिंपरी : आपल्या कामाचा आलेख मोठा आहे. डोळ्यावरील पट्टी उघडली तरच विरोधकांना आपली कामे दिसतील. त्यांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करावे. कामे जनतेपर्यंत पोहोचवावीत. गाफील राहू नका, उद्याच निवडणूक आहे असे गृहित धरुन कामाला लागण्याचे आवाहन मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी कार्यकर्त्यांना केले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा काळेवाडीत पदाधिकारी मेळावा झाला. पक्ष संघटना, निवडणूक रणनिती, काम करण्याबाबत खासदार बारणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. खासदार बारणे म्हणाले, पिंपरीत पासपोर्ट कार्यालय सुरु केली. मेट्रो निगडीपर्यंत नेली. पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरणातील गाळ स्वखर्चाने काढला. रेल्वेच्या तिस-या, चौथ्या ट्रॅकसाठी पाठपुरावा केला. त्याचा 50 टक्के खर्च राज्य सरकारने उचलला आहे. त्यामुळे कामाला गती मिळाली आहे.

पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून मतदारसंघात रस्ते केले. पंतप्रधान आवास योजनेतून 2 हजार 147 कोटी रुपये आणले. दीन दयाळ योजनेअंतर्गत द्रारिद्र्य रेषेखोलील लोकांना लाभ दिला. मावळातील दुर्गम भागात, आदिवासी पाड्यांवर लाईट नेली. रस्ते केले. इलिफंटा लेणीवर पाण्याखालून लाईट पोहोचविली. मुद्रा योजनेअंतर्गत 1200 कोटी रुपयांचा लाभ नागरिकांना मिळवून दिला. पनवेल ते उरण रेल्वे चालू केली. पनवेल ते कर्जत रेल्वेचे काम चालू आहे. लोणावळा, देहूरोड, चिंचवड, तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनचा कायापालाट होत आहे. आई एकविरा देवी परिसराचा विकास होत आहे. माथेरानमध्ये टाय ट्रेन सुरु केली. जिझिया शास्तीकर रद्द केला. 565 कोटी माफ केले. येत्या काही दिवसातच साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न मार्गी लागेल. नगरविकास, जिल्हा नियोजन, खासदार निधीतून रस्त्यांची कामे केली. कामांची मोठी जंत्री आहे. ही कामे लोकांपर्यंत पोहचावावित. शासन आपल्या दारी योजनेतून लोकांना जागेवर कागदपत्रे उपलब्ध करुन दिली. शहरासाठी मुळशी धरणातून पाणी आरक्षित केले जाणार आहे.

भाजप-आरपीआयसह महायुतीतील मित्र पक्षांच्या पाठिंब्याने दोनवेळा मी संसदेत गेलो. आता 2024 ची निवडणुकही शिवसेनकडून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लढणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा निर्धार केला. शहराच्या विकासावर त्यांचे लक्ष आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचेही मोठे योगदान, सहकार्य मिळत आहे. या सर्वांच्या पाठिंब्यावर आगामी निवडणूक लढणार आणि जिंकणार असा निर्धार खासदार बारणे यांनी केला. मतदारांचे लक्ष विचलित करण्यासाठी विरोधक काहीही आरोप करु शकतात. त्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहनही त्यांनी केले. एकंदरीत खासदार बारणे यांचे भाषण कार्यकर्त्यांना उर्जा देणारे झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button