breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

ठाकरे, पवार, काँग्रेसच्या ‘या’ जागांवर वंचितचा दावा; ४८ पैकी २७ जागा मागितल्या

मुंबई  : वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे अखेर लोकसभा जागांची मागणी केली आहे. वंचितनेआघाडीकडे एकूण २७ जागांची मागणी केली आहे. विशेष म्हणजे वंचितने ४८ पैकी २७ जागांवर दावा केल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसच्याच अनेक जागांवर वंचितने दावा सांगितला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीची आज बैठक होती. या बैठकीत वंचितने २७ जागांची मागणी केल्याचं सांगितलं जात आहे. वंचितने ज्या जागा मागितल्या त्याची नावेही व्हायरल झाली आहेत. त्यातील अनेक जागांवर काँग्रेस, शरद पवार आणि अजित पवार गटाचे आमदार आहेत. तरीही वंचितने या जागा मागितल्या आहेत. काही काँग्रेस ज्या जागांवर सतत पराभूत होत आलेली आहे, अशा जागाही मागण्यात आल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीबद्दल महाविकास आघाडीची लपवाछपवीची रणनीती आणि उदासीन वृत्ती लक्षात घेऊन याआधी वंचितने ज्या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली होती. त्या लोकसभा मतदारसंघाची यादी वंचितने तयार केली होती. आता महाविकास आघाडीने वंचितसोबत चर्चा सुरु केली आहे. तरीही वंचितने पूर्ण तयारी केलेल्या त्या मतदारसंघांची यादी महाविकास आघाडीला दिली आहे, असं वंचितने म्हटलं आहे.

वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरी गेली असती, तर या यादीतील मतदारसंघातील जागा लढविल्या असत्या. पण, आता वंचितला आशा आहे की, या मतदारसंघांवर तीन पक्षांसोबत फलदायी चर्चा आणि वाटाघाटी होतील. दरम्यान, वंचितच्या मागणीवर अंतर्गत चर्चा करून आणखी एक बैठक घेण्यास महाविकास आघाडीने सहमती दर्शवली आहे, असं वंचितने म्हटलं आहे.

हेही वाचा – Bank Holidays | मार्च महिन्यात तब्बल १४ दिवस बँकांना सुट्टी, जाणून घ्या सुट्ट्यांची यादी!

वंचितने मागितलेल्या जागा

अकोला – (ठाकरे वंचित बहुजन आघाडीसाठी सोडणार)

अमरावती -काँग्रेस

नागपूर -काँग्रेस

भंडारा-गोंदिया -काँग्रेस

चंद्रपूर -काँग्रेस

हिंगोली – तिढा कायम

उस्मानाबाद -शिवसेना ठाकरे गट

औरंगाबाद -शिवसेना ठाकरे गट

बीड -राष्ट्रवादी

सोलापूर -काँग्रेस

सांगली -काँग्रेस

माढा -राष्ट्रवादी

रावेर -राष्ट्रवादी

दिंडोरी -राष्ट्रवादी

शिर्डी – तिढा कायम

मुंबई साऊथ सेंट्रल – शिवसेना ठाकरे गट

मुंबई उत्तर मध्य -काँग्रेस

मुंबई उत्तर पूर्व -काँग्रेस

रामटेक -तिढा कायम

सातारा -राष्ट्रवादी

नाशिक -शिवसेना ठाकरे गट

मावळ -शिवसेना ठाकरे गट

धुळे -काँग्रेस

नांदेड -काँग्रेस

बुलढाणा – शिवसेना ठाकरे गट

वर्धा – तिढा कायम

वंचितची यादी व्हायरल झाल्यानंतर उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे वंचितने तातडीने खुलासा केला आहे. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला दिलेल्या मतदारसंघांची यादी ही गेल्या पाच वर्षांपासून ज्या जागांची तयारी पूर्ण ताकदीने करण्यात आली होती, त्या जागांची आहे. महाविकास आघाडीसोबत येण्याआधीची ही यादी असून, त्या अशा जागा आहेत, ज्या ठिकाणी वंचितला जिंकण्याची खात्री होती. त्यामुळे वंचितने अद्याप किती जागा हव्यात, याबाबत कोणतीही मागणी केलेली नाही.

महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक झाली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे चार प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी वंचित बहुजन आघाडीने एक प्रस्ताव मविआला दिला असून, ज्या जागांवर युती होण्याआधी वंचितने तयारी केली आणि जिथे जिंकण्याची खात्री होती, त्या जागांची माहिती विश्वासाने मविआला दिली आहे. वंचितच्या या मागणीवर अंतर्गत चर्चा करून आणखी एक बैठक घेण्यास महाविकास आघाडीने सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आणखी एका बैठकीनंतर चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button