breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

Bank Holidays | मार्च महिन्यात तब्बल १४ दिवस बँकांना सुट्टी, जाणून घ्या सुट्ट्यांची यादी!

Bank Holidays | बँकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. मार्च महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केली आहव. त्यानुसार मार्च महिन्यात अनेक सणांमुळे देशभरातील बँका १४ दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये ५ रविवारसह १४ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे आपल्या बॅंकेतील व्यवहारांचं योग्य नियोजन करा, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं.

मार्चमध्ये कोणत्या दिवशी बँका बंद राहणार?

१ मार्च २०२४ : मिझोराममध्ये छपचार कुट सणानिमित्त बँका बंद राहतील.

३ मार्च २०२४ : रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

८ मार्च २०२४ : महाशिवरात्रीच्या निमित्ताने गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाब, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, जम्मू, उत्तर प्रदेश, केरळ, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, शिमला या राज्यांमध्ये बँक सुट्टी असेल.

९ मार्च २०२४ : दुसरा शनिवार असल्यामुळे या दिवशी बँकेला सुट्टी असेल.

१० मार्च २०२४ : रविवारमुळे बँकेला सुट्टी असेल.

हेही वाचा       –        धक्कादायक! अकोल्यात विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात मेलेल्या उंदराचे अवशेष 

१७ मार्च २०२४ : रविवारमुळे बँकेला सुट्टी असेल.

२२ मार्च २०२४ : बिहार दिनानिमित्त बिहारमधील बँकांना सुट्टी असेल.

२३ मार्च २०२४ : चौथ्या शनिवारमुळे बँकेला सुट्टी असेल.

२४ मार्च २०२४ : रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

२५ मार्च २०२४ : होळीमुळे बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, इंफाळ, कोची, कोहिमा, पणजी, श्रीनगर आणि केरळ झोन वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.

२६ मार्च २०२४ : होळीमुळे भुवनेश्वर, इंफाळ, पणजी येथे बँकांना सुट्टी असेल.

२७ मार्च २०२४ : होळीमुळे बिहारमध्ये बँका बंद राहतील.

२९ मार्च २०२४ : गुड फ्रायडेमुळे श्रीनगर, शिमला, जम्मू, जयपूर, गुवाहाटी आणि आगरतळा झोन वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.

३१ मार्च २०२४ : रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button