breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

धक्कादायक! पिंपरी-चिंचवडमधील दोन सख्ख्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू

पिंपरी |

कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या विळख्यात आल्यामुळे कुटुंबच्या कुटुंबं उद्ध्वस्त झाल्याचं समोर येत आहे. आता पिंपरी चिंचवडमध्ये दोन सख्ख्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आकुर्डी परिसरातील दत्तनगर येथील आदित्य विजय जाधव (वय २८) आणि अपूर्व विजय जाधव (वय २५) या दोन सख्ख्या भावांचे कोरोनामुळे निधन झालं. त्यांच्या वडिलांवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आदित्य हा नमो बिल्डर्सकडे नोकरीस होता, तर अपूर्व पुणे त्यांचे महापालिकेत कंत्राटी कामगार होता. पिंपरी चिंचवडमध्ये आकुर्डी भागात जाधव कुटुंबिय राहतात.

पिंपरी-चिंचवडमध्ये आदित्य जाधव आणि अपूर्व जाधव यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या दोघांना २० दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरु होते. गुरुवारी (२० मे) दुपारी अपूर्व जाधव याचा मृत्यू झाला. तर अवघ्या दोन दिवसात म्हणजे काल (२२ मे) पहाटे आदित्य जाधव याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विशेष म्हणजे आदित्य जाधव यांचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तर अपूर्वचा विवाह येत्या दिवाळीमध्ये होणार होता. या दरम्यान अपूर्व आणि आदित्य यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी कोरोनाची चाचणी केली होती. यावेळी त्यांच्या कुटुंबात आई, वडील आणि आदित्य यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली. यात त्यांची आई आणि आदित्यची पत्नी या दोघीही कोरोनामुक्त झाल्या आहेत. तर वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान दोन सख्ख्या भावांच्या मृत्यूमुळे आकुर्डी परिसरात शोककळा पसरली आहे.

वाचा- चिंताजनक! पुणे जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’चे ४६३ रूग्ण

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button