breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शिवसेना नेते एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेत आणले, आता…; दीपाली सय्यदांसमोर मोठा पेचप्रसंग

मुंबईः विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंडाचे निशाण फडकवले आहे. शिवसेनेची मते फुटल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी थेट सुरत गाठल्याने राजकीय भूकंप झाला. त्यामुळे त्यांच्यासोबत कोण आणि ठाकरेंसोबत कोण, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. परंतु, अद्यापही राज्यातील काही शिवसैनिकांमध्ये संभ्रम आहे. शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद (deepali sayed) यांचं ट्विट सध्या चर्चेत आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवसैनिकांना भावनिक साद घेतली. मुख्यमंत्र्यांचा भाषणाचा परिणाम म्हणजे ठाकरेंनी वर्षा बंगला सोडताना जमलेली शिवसैनिकांची गर्दी. मात्र, तोच आज सकाळी काही आमदार व नेते शिंदेंच्या गटात सहभागी झाले. या सगळ्या घडामोडींवर दीपाली सय्यद यांनी एक ट्विट केलं आहे.

दीपाली सय्यद या नेहमी राजकीय घडामोडींवर भाष्य करत असतात. आताही महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ निर्माण झालं आहे. ‘सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजू गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्विकार करू,’ असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. ‘माननीय उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची श्रीराम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्वाच्या वनवासात कायम राहील. शिवसैनिकांनो रडायचे नाही लढायचे. आपले मत शिवसेनेला कायम राहील. हा रामराज्याचा संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीला जाईल,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button