आरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

खेड मध्ये 27 रुग्ण ; 35 डिस्चार्ज

येलवाडी येथील जेष्ठाचा मृत्यू

पुणे | खेड तालुक्यात सोमवारी (दि. 16 ) 15 गावे आणि 2 पालिकांमध्ये 27 रुग्ण मिळून आले आहेत. तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.येलवाडी येथील 75 वर्षीय पुरुषाचा डी वाय पाटील हॉस्पिटल येथे शनिवारी ( दि. 14 ऑगस्ट ) उपचार सुरु असताना मृत्यू झाला असल्याचे दैनंदिन अहवालात नमूद करण्यात आले आहे

खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 33 हजार 945 झाला आहे. यापैकी 33 हजार 235 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. सोमवारी दिवसभरात 35 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत 235 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी एका मृत्यूने 485 एवढा झाला आहे.

सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 21 रुग्ण, चाकण 4, आळंदी 0, राजगुरुनगर 2 असे एकुण 27 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे-
केळगाव, खरपुडी बु., कुरुळी, नाणेकरवाडी,निमगाव, रेटवडी, शिंदे ,सिद्धेगव्हाण, सोळू ,वासुली,वाफगाव , वाकी खु. या गावांमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण मिळाला आहे. खालुंब्रे, मरकळ मध्ये प्रत्येकी 2 रुग्ण मिळाले असून सावरदरी मध्ये 4 रुग्ण मिळून आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button