breaking-newsपिंपरी / चिंचवड

‘वायसीएम’मध्ये प्लाझ्मा मशिनची कमतरता, महापौरांचे आयुक्तांना पत्र

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव लक्षात घेता महापालिकेने रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, प्लाझ्मा घेण्यासाठी मशिनची कमतरता भासत असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय थांबविण्यासाठी आयुक्तांनी तातडीने प्लाझ्मा घेण्यासाठीचे मशिन उपलब्ध करावे, अशी मागणी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केली आहे.

महापौर ढोरे यांनी आयुक्तांना यासंदर्भात पत्र दिले आहे. हे पत्र न देता त्यांनी आयुक्तांना सक्त सूचना देण्याची गरज असते. कारण, सत्ताधारी पक्षाच्या त्या महापौर आहेत. या खुर्चीचा मान आणि पदाची गरिमा एवढी मोठी आहे की, आयुक्तांना त्याठिकाणावरून आलेला शब्द टाळणे गुन्हा ठरू शकेल. एवढी ताकद पदाची असताना महापौरांनी यासंदर्भात आयुक्तांना चार अक्षराचे पत्र दिले. हे न पटणारे असून याचे महापौरांनी आत्मपरिक्षण करणे गरजेचे ठरते.

वायसीएम रुग्णालयात प्लाझ्मा घेण्यासाठी एकच मशिन उपलब्ध आहे. त्यावर प्लाझ्मा दान करणा-यांचा तान पढत आहे. हा तान कमी करण्यासाठी नवीन मशिन उपलब्ध करण्याची गरज आहे. जास्तीजास्त व्यक्तींचा प्लाझ्मा घेण्याची सोय झाल्यास रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपी करता येऊ शकेल. त्यातून कोविड बाधित रुग्णांना बरे करण्यास मदत होईल, अशी मागणी महापौर ढोरे यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांना केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button