breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘सत्तेसाठी कधीही प्रतारणा करणार नाही…’; अखेर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई : शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नाराज आमदारांना घेऊन बंडाचं निशाण फडकावलं आहे. शिवसेनेतील काही आमदारांसह एकनाथ शिंदे हे थेट सुरतला दाखल झाल्याने ते पक्ष सोडणार का, अशी चर्चा सुरू होती. हा सर्व राजकीय गदारोळ सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,’ असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या ट्वीटमुळे ते शिवसेनेतच थांबण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे मंत्री शिंदे यांचे पक्षनेतृत्वासोबत बोलणं होऊन मतभेद दूर झाले आहेत का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button