Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिल्यास शिवसेनाही तयार, उचलणार मोठं पाऊल

मुंबई : भाजपने राज्यपालांना पत्र लिहून महाविकास आघाडी सरकारने बहुमत सिद्ध करावं, अशी मागणी केली आहे. आता सत्तासंघर्षात शिवसेनेनेही कंबर कसली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यास शिवसेनाही सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी करेल, असं सूत्रांनी सांगितलं आहे. अपक्ष आमदारांचा गट राज्यपाल कोश्यारींना भेटणार आहे. आणि राज्यातील महाविका आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचं कळवणार आहे, असं सांगण्यात येत आहे. यामुळे राज्य सरकार अल्पमतात येईल, असं बोललं जात आहे.

महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेवेळी याच अपक्ष आमदारांनी उद्धव ठाकरे यांना आपला पाठिंबा दर्शवला होता. यामुळे अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढल्यास उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगण्यातशिवाय राज्यपाल कोश्यारींकडे कुठलाही पर्याय राहणार नाही.

राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बुहमत सिद्ध करण्याचे निर्देश दिल्यास शिवसेना सुप्रीम कोर्टात जाईल, अशी माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांच्या आपत्रतेवर १२ जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाने ‘जैसे थे स्थिती’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विश्वासदर्शक ठराव घेण्याबाबत कोर्टाने कुठलेही निर्देश दिलेले नाहीत. यामुळे राज्यपाल मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. पण राज्यापालांकडून मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश आल्यास शिवसेना सुप्रीम कोर्टात जाईल, असं सावंत यांनी सांगितलं.

सुप्रीम कोर्टाने जैसे थे स्थिती’ ठेवण्याचे आदेश दिल्याने राज्यपाल बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देणार नाहीत. कारण हे प्रकरण कोर्टात आहे. यामुळे १२ जुलैपर्यंत सर्वाना थांबावं लागेल, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगणं अतिशय चुकीचं असेल, असं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पक्षाचे व्हीप नाकारणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याविरोधातील अविश्वास ठराव आणि अजय चौधरी यांची शिवसेना गटनेते पदी नियुक्ती, हे तीन मोठे आणि महत्त्वाचे मुद्दे सुप्रीम कोर्टासमोर आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यपाल मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देणार नाही, असं चव्हाण म्हणाले.

आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी कोर्टात याचिकेवर सुनावणी सुरू आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगण्यात येऊ नये, अशी मागणी महाविकास आघाडीचे वकील देवदत्त कामत यांनी सुप्रीम कोर्टात केली होती. पण कोर्टाने यासंदर्भात कुठलाही आदेश देण्यास नकार दिला. मात्र, शिवसेनाला सुप्रीम कोर्टात याचिका करण्याची मुभा दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button