breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोडसेचा गवगवा करणा-या मुंबईच्या उपायुक्त निधी चौधरी यांची हकालपट्टी करा – जितेंद्र आव्हाड

मुंबई – नोटांवरुनमहात्मा गांधींचा फोटो काढा, त्यांचे पुतळे पाडा, थँक्यू गोडसे…’ अशा अर्थाचे वादग्रस्त ट्विट  करून मुंबई महापालिकेच्या उपायुक्त (विशेष) आणि सनदी अधिकारी निधी चौधरी यांनी वाद अंगावर ओढून घेतला आहे. आपल्या ट्विटमुळे नवा वाद सुरू झाल्याचं लक्षात येताच चौधरी यांनी आपलं ट्विट डिलीट केलं आहे. त्यासोबत दुसरं ट्विट करुन त्यांनी स्वतःची बाजू मांडण्याचाही केविलवाना प्रयत्न केला आहे. दुसरीकडे, राष्ट्रपित्याचा अपमान करणाऱ्या चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही निधी चौधरी यांची महापालिकेच्या सेवेतून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

 

असे आहे प्रकरण 
17 मे रोजी निधी चौधरी यांनी ‘महात्मा गांधी यांची 150 वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. पण, आता वेळ आली आहे…जे रस्ते, संस्थांना गांधींचे नाव दिले आहे, ते काढून टाकावे…जगभरातील त्यांचे पुतळे पाडण्यात यावेत…तसेच नोटांवरूनही त्यांचा फोटो काढून टाकावा…हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल…30-1-1948 साठी थँक्यू गोडसे.’ असे वादग्रस्त ट्विट करुन महात्मा गांधींच्या पार्थिवाचं छायाचित्र त्यासोबत शेअर केलं होतं. त्यानंतर त्यांचं हे ट्विट काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यावर लोकांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत असल्याचं पाहून निधी चौधरी यांनी ते ट्विट डिलीट केले आणि नवीन ट्विट्सद्वारे आपली बाजू मांडली आहे.

https://twitter.com/nidhichoudhari/status/1134520012398456832

निधी चौधरी यांनी दिले स्पष्टीकरण
काही लोकांचा गैरसमज झाल्यामुळे मी गांधीजींबाबतचं ट्वीट डिलीट केलं आहे. तुम्ही 2011 पासून माझी टाईमलाईन पाहिलीत, तर त्यांना समजेल, की मी गांधीजींचा अवमान करण्याचा स्वप्नातही विचार करु शकत नाही. माझे ट्वीट व्यंगात्मक होते. आंदोलन करणाऱ्यांनी ते पूर्ण वाचलेले नाही. त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो आहे. गांधीजींवर माझी अपार श्रद्धा आहे. माझ्याकडून त्यांचा अवमान होणे शक्यच नाही. गांधीजींवर यापूर्वी मी अनेकदा ट्वीट केले आहे, ती पाहू शकता. गांधीजी या देशात जन्माला आले, याबाबत आपण देवाचे आभार मानले पाहिजेत, असे ट्वीट मी यापूर्वी केलेले आहेत. त्यामुळे गांधीजींची हत्या करणाऱ्याचे समर्थन मी कधीच करणार नाही. काही लोक या ट्वीटचा राजकीय लाभ उठवू पाहात आहेत, हे दुर्दैवी आहे. गांधीजींचा अवमान करण्याचा मी स्वप्नातही विचार करु शकत नाही. असं स्पष्टीकरण निधी यांनी आपल्या विविध ट्विटमध्ये दिलं आहे.

निधी चौधरी आहेत तरी कोण
निधी चौधरी या आयएएस 2012 बॅचच्या अधिकारी असून सध्या मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त (विशेष) आहेत. याआधी त्या सहाय्यक कलेक्टर होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button