breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

Airtel ,Vodafone आणि Jio चे 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे बेस्ट प्लान

डिसेंबर २०१९ मध्ये टॅरिफ महाग झाल्यानंतर Reliance Jio सह Airtel आणि Vodafone च्या प्लानमध्ये खूप मोठा बदल झाला आहे. कंपन्यांना नुकसान होत असल्याने प्रीपेड प्लान महाग करावे लागल्याचं कंपन्यांनी म्हटले होतं. परंतु, काही कंपन्या टॅरिफ महाग झाल्यानंतरही १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे काही प्लान ऑफर करत आहेत. या प्लानमध्ये कॉलिंग, डेटा बेनिफिट दिला जात आहे. तर पाहुयात कोणते प्लान आहेत ते…

Airtel चे १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लान

१९ रुपयांचा प्लान

एअरटेलच्या या प्लानमध्ये देशभरात कोणत्याही नेटवर्कवर ट्रू अनलिमिटेड कॉलिंग दिली जात आहे. दोन दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये एकूण २०० एमबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये फ्री एसएमएस दिले जात नाही.

७९ रुपयांचा प्लान

एअरटेलच्या या स्मार्ट रिचार्जवर युजर्संना ६४ रुपयांचा टॉकटाइम मिळतो. २०० एमबी डेटासह या प्लानची वैधता २८ दिवस इतकी आहे. या प्लानमध्ये प्रति मिनिटाला ६० पैसे या दराने चार्ज केला जातो.

४९ रुपयांचा प्लान

एअरटेलचा हा स्मार्ट रिचार्जची वैधता २८ दिवसांची आहे. १०० एमबी डेटा युजर्संना दिला जातो. प्लानच्या रिचार्जवर ३८.५२ रूपयांचा टॉकटॉइम दिला जातो.

Vodafone चा १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा प्लान

१९ रुपयांचा प्लान

व्होडाफोनच्या या प्लानची वैधता २ दिवसांची आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह २०० एमबी डेटा दिला जातो. या प्लानचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यात व्होडाफोन प्ले आमि ५ जी चे सब्सक्रिप्सन दिले जाते.

Reliance Jio चे १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा प्लान

७५ रुपयांचा प्लान

कंपनीचा हा प्लान केवळ जिओ फोन युजर्ससाठी आहे. या प्लानची वैधता २८ दिवस आहे. या प्लानमध्ये एकूण ३जीबी डेटा मिळतो. ५० फ्री एसएमएस दिले जातात. या प्लानमध्ये जिओ नेटवर्क्ससाठी अनलिमिटेड आणि नॉन जिओ नेटवर्क्ससाठी ५०० मिनिट्स दिले जातात. प्लानसोबत जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

६९ रुपयांचा प्लान

हा प्लान जिओ फोन युजर्संसाठी आहे. २५ फ्री एसएमएस आणि ७ जीबी डेटा ऑफर मिळणाऱ्या या प्लानची वैधता १४ दिवस इतकी आहे. प्लानमध्ये जिओ नेटवर्क्ससाठी अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. तर दुसरीकडे नेटवर्क्सवर कॉल करण्यासाठी यात २५० मिनिट्स मिळणार आहे. या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button