breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसातारा

पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवसन्मान पुरस्कार जाहीर

साताऱ्यात शिवजयंतीदिनी होणार वितरण

Shiv Sanman Award : शिवजयंतीदिनी (दि. १९ फेब्रुवारी) समारंभ पूर्वक शिवसन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.साताऱ्याचे राजघराणे आणि शिवभक्तांच्यावतीनं यंदापासून शिवसन्मान पुरस्कार’ देण्यात येणार आहे. यंदाचा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे.

खासदार उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज आहेत.साताऱ्याच्या राजगादीला मोठा मान आहे.  साताऱ्याचे राजघराणे आणि तमाम शिवभक्तांच्यावतीनं यंदापासून ‘शिवसन्मान पुरस्कार’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. दिनांक १९ फेब्रुवारी रोजी साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावरील समारंभात पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

हेही वाचा – पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई, ठेवी, व्यवहार, वॉलेट आणि फास्टॅगसह अनेक सेवा बंद

पुरस्कार वितरण सोहळा सैनिक स्कूलच्या मैदानावर होणार आहे. यानिमित्त बुधवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या समवेत पाहणी केली.  यावेळी सैनिक स्कूलचे प्राचार्य, अधीक्षक, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, सुनील काटकर, काका धुमाळ, पंकज चव्हाण, मनोज शेंडे, विनीत पाटील उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सातारा दौऱ्यावर आल्यानंतर  स्व. लक्ष्मणराव इनामदार जलसिंचन योजनेला भेट देणार आहेत. माण-खटाव तालुक्याची रक्तवाहिनी असणाऱ्या जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचं ‘गुरूवर्य स्व. लक्ष्मणराव इनामदार जलसिंचन योजना’ असं नामकरण झालं आहे. लक्ष्मणराव इनामदार हे खटावचे सुपुत्र आणि पंतप्रधान मोदींचे गुरूवर्य होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ख्याती देश-विदेशात आहे. यापूर्वीही त्यांना देश-विदेशातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यापूर्वी महाराष्ट्रातील टिळक पुरस्कारही पंतप्रधान नरेंद्र मोदीना मागील वर्षी देण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button