breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

आशा सेविका, अंगणवाडी सेविकांना आयुष्मान योजनेचा लाभ मिळणार; अर्थमंत्री निर्मला सितारामण यांची घोषणा

Interim Budget 2024 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करीत आहेत. या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आशा सेविका, अंगणवाडी सेविकांसाठी मोठी घोषणा केली आहे. देशभरातील सर्व आशा आणि अंगणवाडी सेविकांना आता आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या की, गेल्या १० वर्षांत महिला सक्षमीकरणावर भर, महिला सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल, तिहेरी तलाक हा मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, पीएम आवास योजने अंतर्गत ग्रामीण भागात ७० टक्के महिलांना घरं मिळाली.

हेही वाचा   –   शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला अटक

बजेटमध्ये महिलांसाठी काय?

  • माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी देशव्यापी कार्यक्रम
  • बालकांच्या लसीकरणाला देणार वेग
  • आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविकांना आयुष्मान योजनेचा लाभ देणार
  • उद्योजकतेच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणावर भर
  • महिला कर्मचाऱ्यांच्या वाढत्या सहभागातून महिला सक्षमीकरणाची साक्ष मिळत आहे
  • त्रिवार तलाक रद्द करत महिलांना सन्मान मिळवून दिला.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button