breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्र

पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई, ठेवी, व्यवहार, वॉलेट आणि फास्टॅगसह अनेक सेवा बंद

RBI Action : दिग्गज फिनटेक कंपनी पेटीएमला मोठा झटका बसला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. हा निर्णय तात्काळ लागू करण्यात आला आहे. केंद्रीय बँकेने बुधवारी सांगितले की, बँक अनेक नियमांचे उल्लंघन करत आहे.

लेखापरीक्षण अहवालात ही बाब समोर आली आहे. या बंदीनंतर ग्राहकांना त्यांच्या खात्यात पैसे जमा करता येणार नाहीत. तसेच वॉलेट, फास्टॅग आणि एनसीएमसी कार्ड देखील टॉपअप केले जाणार नाही, असे आरबीआयने म्हटले आहे. मात्र, ग्राहकांना पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, पेटीएम पेमेंट्स बँकेने कोणत्याही ग्राहकाकडून पैसे जमा करू नयेत. २९ फेब्रुवारीनंतर कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात कोणत्याही प्रकारची ठेव स्वीकारली जाणार नाही. हे पैसे वॉलेट, फास्टॅग किंवा इतर कोणत्याही प्रीपेड प्रणालीद्वारे घेतले असले तरीही. रिझर्व्ह बँकेने सांगितले की, बाह्य लेखापरीक्षकांच्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा – मनोज जरांगे पाटील १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण करणार

या अहवालांवरून असे दिसून आले की बँक अनेक आर्थिक नियमांचे पालन करण्यात सातत्याने अपयशी ठरली आहे. याशिवाय अनेक प्रकारची अनियमितता आढळून आली. पेटीएम पेमेंट्स बँकेवरील या आरोपांची चौकशी सुरूच राहणार आहे.

सध्या नवीन ग्राहक जोडू नयेत, अशा सूचना मध्यवर्ती बँकेने दिल्या. तसेच, ग्राहकाला त्याच्या खात्यातून पैसे काढण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. ग्राहक त्यांच्या बचत, चालू, प्रीपेड, फास्टटॅग आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) मधून कोणत्याही अडचणीशिवाय पैसे काढू शकतील.

मध्यवर्ती बँकेने सर्व बँकिंग सेवा बंद करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी. पण, पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा द्यावी लागेल. यामध्ये AEPS, IMPS, BBPOU आणि UPI सुविधांचा समावेश आहे. याशिवाय RBI ने One97 Communications आणि Paytm Payments Bank Services Limited ची नोडल खाती लवकरात लवकर बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, बँकेला सर्व व्यवहार आणि नोडल खाती सेटल करण्यासाठी १५ मार्चपर्यंत वेळ देण्यात आला आहे. यानंतर कोणताही व्यवहार स्वीकारला जाणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button