breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

उच्च न्यायालयाच्या निकालानंतर अमरावतीत शिवसैनिकांचा जल्लोष

अमरावती |

खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिल्यानंतर अमरावतीत शिवसैनिकांनी राजकमल चौक येथे ढोल-ताशे वाजवत आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून नवनीत राणा यांनी निवडणूक लढवली होती. तेव्हाच नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रोर करण्यात आली होती. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी नवनीत राणा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जात वैधता प्रमाणपत्र  मिळवल्याचा आरोप करण्यात आला.

२०१४ च्या निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाला. आनंदराव अडसूळ निवडून आले होते. दरम्यान, २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा नवनीत राणा अमरावती मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवार होत्या. आनंदराव अडसूळ सलग ७ वर्षांपासून नवनीत राणा यांच्या  जात  प्रमाणपत्राच्या प्रकरणात न्यायालयात लढा देत होते. त्यांनी निवडणूक लढवताना बनावट जात प्रमाणपत्राचा आधार घेतला, हे न्यायालयाच्या निकालाने स्पष्ट झाले आहे. आज सात वर्षांनंतर आनंदराव अडसूळ यांच्या बाजूने निकाल लागल्याने आम्ही जल्लोष साजरा केला, असे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील खराटे म्हणाले.

  • राजकमल चौकात फटाक्यांची आतषबाजी

शिवसैनिकांनी राजकमल चौकात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. सुनील भालेराव यांच्यासह जिल्ह्यच्या सहसंपर्क प्रमुख प्रवीण हरमकर, माजी उपमहापौर रामा सोळंके यांच्यासह शेकडो शिवसैनिक या जल्लोषात सहभागी झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button