breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नातेवाईकांच्या मदतीने आरोपी पोलिसांच्या तावडीतून पलायन

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

एका गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीला तपासासाठी घटनास्थळी आणले असता त्याठिकाणी नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांशी हुज्जत घालत आरोपी पोलिसांच्या तावडीतून पसार झाला. ही घटना पिंपरीतील शेवाळे सेंटर कंपनीच्या आवारात घडली.

नदीम गफूर शेख (वय 19) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह सहारा नदीम शेख (वय 19), गफूर जावेद शेख (वय 32, सर्व रा. रिव्हर रोड, पिंपरी), आरोपीची मामेबहीण सुषमा राजू परदेशी (वय 18, रा. शेवाळे सेंटर कंपनी आवार, पिंपरी) यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार संजय तोडमल यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी आरोपी नदीम याला एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्या गुन्ह्याच्या तपासासाठी पिंपरी पोलिस ठाण्यातील हवालदार तोडमल, आदवडे व झगडे हे तिघेजण आरोपीला घेवून बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास पिंपरीतील शेवाळे सेंटर कंपनीच्या आवारात आले होते. त्यावेळी आरोपीचे नातेवाईक तेथे आले. त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला. या गोंधळाचा फायदा घेवून आरोपी नदीम पोलिसांच्या तावडीतून पसार झाला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी नदीसमह त्याच्या नातेवाईकांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button