breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

शिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण;छगन भुजबळ यांच्या याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना

मुंबई व ठाणे शिधावाटप यंत्रणेतील अधिकृत शिधावाटप दुकानांतून सर्वसाधारण दर्जाचे अन्नधान्य वितरित करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु, असे असताना सुद्धा काही अधिकृत शिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण करण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी येत आहे ..आणि याची दखल आता अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली आहे. याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचनादेखील त्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, त्या अनुषंगाने दक्षता पथकामार्फत या दुकानाची अन्नधान्याच्या दर्जाबाबतची तसेच इतर बाबींची संपूर्ण तपासणी केली असता आढळून आलेल्या त्रुटीसंदर्भात जीवनावश्यक वस्तु कायदा, 1955 अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे

आतापर्यंत राज्यातील अनेक शिधा दुकानदारांची तपासणी करण्यात आली आहे. यात लाखो रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दोषी दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय याप्रकरणी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे, असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

कोणीही अधिकृत शिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाचे अन्न वितरीत करण्याचा प्रयत्न करीत असल्यास कार्यालयाच्या हेल्पलाईन क्र. 022-22852814 तसेच ई-मेल आयडी [email protected] यावर संपर्क साधावा, असं आवाहन भुजबळ यांनी यावेळी केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button