breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात ‘हा’ आजार पसरतोय वेगाने; जाणून घ्या लक्षणं आणि उपाययोजना

मुंबई : आजकाल वाढत्या प्रदूषणामुळे आजारांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे वाढत्या प्रदूषणाचा फटका नागरिकांच्या शरीरावर होत आहे. जलप्रदूषण, हवाप्रदूषण, ध्वनिप्रदूषण याचा परिणाम लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत होत आहे. याशिवाय नागरिकांना धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणे देखील शक्य होत नाही. या सगळ्यामुळे नागरिकांची जीवनशैली बदलत चालली आहे. जेवणाची, झोपण्याची वेळ पाळली जात नसल्याने कोणत्या ना कोणत्या आजाराला आपण आमंत्रण देत असतो.

अशातच आता आरोग्य विभागाने एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात लहान मुलांमध्ये डेंग्यु हा आजार झपाट्याने पसरत असल्याचं सांगितलं आहे. लहान मुलांची प्रतिकार शक्ती पाहता त्यांच्यासाठी हा आजार एक गंभीर आहे. डेंग्यू ताप हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा आजार इडिस इजिप्‍ती या प्रजातीचा डास चावल्यामुळे होतो. हा मच्छर रुग्णाला चावल्यास ४ ते ५ दिवसांनी या आजाराची लक्षणे दिसून येतात. यामध्ये रुग्णाला जास्त ताप येतो. लहान मुलांना हा आजार झाल्यास अफाट ताप येतो म्हणजेच डॉक्टरांच्या माहितीनुसार हा ताप १०२ ते १०४ अंश सेल्सिअसपर्यंत येतो. यामुळे रुग्णाची प्रतिकारक शक्ती कमी होते. व प्लेटलेट्स देखील झपाट्याने कमी होतात.

अशा परिस्थितीत पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जर ताप आल्यास वैद्यकीय सल्ल्यानंतरही ताप ४ ते ५ दिवस उलटूनही कमी होत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने डेंग्यू आजाराच्या तपासण्या करून घ्याव्यात आणि त्या आजारावर निदान करावे. तसेच महत्वाचे म्हणजे तुम्ही राहता त्या ठिकाणी डासांवर आळा बसण्यासाठी घरगुती उपाय करावेत. महत्वाचं म्हणजे घराच्या शेजारी पाणी साठू देऊ नका, जर पाणी साचलेले असेल तर ते रिकामे करावे. या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. यामुळे रोगराई कमी होण्यास मदत होईल.

हेही वाचा – ‘जीआयएस प्रणाली नुसार चालणार महानगरपालिका विविध विभागांचे कामकाज’; आयुक्त शेखर सिंह

ही आहेत डेंग्यू आजाराची लक्षणे :

  1. जास्त प्रमाणात ताप येणे.
  2. उलट्या, मळमळ होणे.
  3. शरीरावर काही प्रमाणात पुरळ येणे.
  4. नाक व हिरड्यांद्वारे रक्त येणे.
  5. जास्त प्रमाणात डोके दुखणे.
  6. शरीर दुखणे व कणकणी येणे.
  7. चव आणि भूक न लागणे.

डेंग्यू आजारापासून सुटका कधी कराल?

  • सर्वात प्रथम तुम्ही वैद्यकीय सल्ला घेणे फार महत्वाचे आहे. जर तुमच्या मुलाला ४ ते ५ दिवस ताप येत असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जावे.
  • तुमच्या सभोतालचा परिसर कायम स्वच्छ ठेवा.
  • तुम्ही दररोज पिण्याचे व वापराच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करा.
  • उन्हाळ्यात कुलरचा वापर जास्त होतो. त्यामुळे कूलरमधील पाणी वेळोवेळी बदलत राहा.
  • लहान मुलं सकाळी व संध्याकाळी घराबाहेर पडत असेल तर ते बंद करा.
  • जर मुलांचे शरीर खूप थंड पडत असल्यास लवकरत लवकर वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप : आरोग्यविषयीची ही माहिती फक्त वाचकांसाठी असून याबाबतची कोणतीही खात्री आम्ही घेत नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button