TOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

नीलम गोऱ्हे यांच्या सभापतीपदावरच शेकापचा आक्षेप; आमदार भाई जयंत पाटील आक्रमक

मुंबईः
विधान परिषदेचं कामकाज सुरु झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच संपलं. नव्या मंत्र्यांची ओळख करुन दिल्यानंतर शेकापचे जयंत पाटील यांनी विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरच आक्षेप घेतला. सभापती महोदया तुमच्यावर आक्षेप आहे असं ते म्हणाले. जे सभागृह आपण चालवत असताना ज्या या पदावर बसल्या त्यावेळी त्यांचा पक्ष नसतो असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. विधान परिषदेच्या अध्यक्षांचं पक्ष सदस्यत्व जातं. आम्ही कोर्टात जाणार नाही कारण ते तुमच्यासाठी सोपं आहे असंही शेकापचे जयंत पाटील भाजपा नेत्यांना उद्देशून म्हणाले. नीलम गोऱ्हे शिवसेनेत गेल्यामुळे जयंत पाटील यांनी त्यांच्या सभापती पदावरच आक्षेप घेतला.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
यानंतर पॉईंट ऑर्डर द्वारे देवेंद्र फडणवीस म्हणाले की असं कधीही कुठल्याही वेळी सभापतींवर आक्षेप घेता येत नाही. त्याचे काही नियम आहेत. नियमांमध्ये बसत असेल तरच आक्षेप घेता येतो. त्यामुळे हा आक्षेप घेता येणार नाही. सभापतींना माझी विनंती आहे की आज शोक प्रस्तावासारखा महत्त्वाचा प्रस्ताव आहे अशावेळी नियमबाह्य कामकाज करता येणार नाही. त्यामुळे सन्मानिय सदस्य जो आक्षेप घेत आहेत तो नोटीस न देता सदस्यांना घेता येणार नाही अशी पॉईंट ऑफ ऑर्डर उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी नीलम गोऱ्हेंवर घेतलेला आक्षेप खोडून काढला. यानंतर नीलम गोऱ्हे स्वतःच बोलायला उभ्या राहिल्या.

नीलम गोऱ्हे यांनी काय म्हटलं आहे?
मी विधान परिषद सदस्य जयंत पाटील यांना बोलण्याची संमती दिली. मी लोकशाहीवादी व्यक्ती आहे. पण मला एक बाब सांगायची आहे. तुम्हाला गोंगाट करायचा आहे, हुर्यो करायचा आहे तर आधी मी सांगू इच्छिते की शोक प्रस्तावाच्या दिवशी आपण दुसरा कुठलाही प्रस्ताव घेत नाही. आज माझी तुम्हाला विनंती आहे की आपण गटनेत्यांच्या मिटिंगला असतात तर मी वेळ निर्धारित केली असती. पण तुम्ही आला नव्हता, विरोधी पक्षनेते, गटनेते कुणीही आलं नाही. तुम्हाला माझ्यावर आक्षेप घेण्यासाठी वेळ दिली असते. उद्या त्याला संमती कधी द्यायची आपण पाहू. असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. यानंतर अध्यादेश वाचण्याचे निर्देश त्यांनी दिले. या दरम्यान घोषणाबाजी सुरु होती. तर देवेंद्र फडणवीस पु्न्हा एकदा म्हणाले की अशा प्रकारे सभागृह चालवता येणार नाही ही लोकशाहीची पायमल्ली आहे. अशात नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळेच त्यावर जयंत पाटील यांनी घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button