breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

Pune : जुन्नरमधील टोमॅटो उत्पादक शेतकरी झाला कोट्याधीश

पुणे : सध्या टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठला आहे. अनेक शहरांमध्ये टोमॅटोचे दर १६० रूपये किलो आहेत. या दरवाढीमुळे शेतकऱ्यांवर अच्छे दीन आले आहेत. पुण्यातील जुन्नरमधील शेतकऱ्याचे नशीबच पालटले आहे. टोमॅटोने पुण्यातील शेतकऱ्याला कोट्याधीश बनलं आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पाचघर गावातील तुकाराम गायकर दाम्पत्यानं १२ एकरातील टोमॅटो पिकाच्या जोरावर सव्वा दोन कोटी रूपयांची कमाई केली आहे. गायकर दाम्पत्य गेल्या सात वर्षांपासून टोमॅटोची शेती करतात. यावेळी त्यांच्यासह इतर शेतकरी देखील लखपती झाले आहेत.

हेही वाचा – ‘बळीराजासह जनसामान्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गायकर कुटुंबाची १८ एकराची बागायत शेती आहे. त्यापैकी १२ एकरवर तुकाराम गायकर यांनी मुलगा ईश्वर आणि सून सोनालीच्या मदतीने टोमॅटोची लागवड केली होती. आता याच निर्णयामुळे ते कोट्याधीश झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button