breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रियव्यापार

ऑक्टोबर महिन्यात देखील एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीबाबत ग्राहकांना मोठा दिलासा

ऑगस्ट आणि सप्टेंबरनंतर सलग तिसऱ्या महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीबाबत ग्राहकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. तेल मार्केटिंग कंपन्यांनी HPCL, BPCL, IOC एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही आहे. दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅम बिना सबसिडीच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 594 रुपयांवर स्थीर आहे. मुंबईमध्ये देखील या गॅस सिलेंडरची किंमत 594 रुपये आहे. दरम्यान 19 किलोग्रॅमच्या सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे.

याआधी जुलै महिन्यात 14 किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 4 रुपयांनी वाढवण्यात आली होती. जून महिन्यात 14.2 किलोग्रॅम बिना-सबसिडीचा सिलेंडर 11.50 रुपयांनी महागला होता. 19 किलोग्रॅमच्या घरगुती सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. दिल्लीत 19 किलोग्रॅम एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1133.50 रुपयावरून वाढून 1166 रुपये झाले आहे. यामध्ये 32 रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबई- मुंबईमध्ये या घरगुती सिलेंडरची किंमत 24.50 रुपयांनी वाढून दर 1089 रुपयांवरून 1113.50 रुपयांवर पोहोचले आहेत,.

कोलकाता- याठिकाणी 19 किलोग्रॅम एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1196 रुपयावरून वाढून 1220 रुपये झाली आहे. यामध्ये 24रुपयांनी वाढ झाली आहे. चेन्नई- याठिकाणी या घरगुती सिलेंडरची किंमत 26 रुपयांनी वाढून दर 1250 रुपयांवरून 1276 रुपयांवर पोहोचले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button