breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

किशोर आवारे हत्याप्रकरणात पोलिसांना सहकार्य करण्यास तयारः आमदार सुनील शेळके

तळेगावः आमदार शेळके यांनी बदनामीसाठी आपल्याला या गुन्ह्यात गोवले असल्याचे आज दुपारी पत्रकारपरिषद घेऊन सांगितले. नॉट रिचेबल असल्याच्या आणि फोन बंद असल्याच्या बातम्या आल्याने ही प्रेस पत्रकार परिषद घेत असल्याचे ते म्हणाले. त्यात घरी बसेन पण जीवावर बेतणारे असे राजकारण करणार नाही, असे ते म्हणाले.

त्याचवेळी माझी बदनामी करून राजकारणातून मला अलिप्त करण्याचा प्रयत्नही सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आपल्या या बदनामीमागे कोण आहेत, त्यांना पुढे आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांना सहकार्य करण्यास तयार आहे. त्यांनी माझी खुशाल चौकशी करावी, पण माझी बदनामी करणाऱ्यांचीही ती करण्याची मागणी त्यांनी केली. गुन्ह्यातील सत्य पोलिस पुढे आणतील, असेही ते म्हणाले.

किशोर आवारे यांच्या खूनाचा तीव्र निषेध आमदार सुनिल शेळके यांनी सुरुवातीसच केला. तसेच त्यांच्या खून्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणीही त्यांनी केली. या घटनेने मावळातील राजकारणात वाईट पायंडा पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आपल्या अख्या आयुष्यात आपण साधी चापटी सुद्धा कुणाला मारली नसल्याकडे त्यांनी सांगितले. यात राजकारण आणू नये, असे आवाहन त्यांनी केले.

१५ वर्षाच्या कामाची फक्त १५ मिनिटात बदनामी होत असल्याने माध्यमांनी खात्री करून बातम्या द्यावात, असे ते कळकळीने म्हणाले. तपासात अडथळा न आणण्याचे तसेच शक्तीप्रदर्शन न करण्यासही त्यांनी आपल्या समर्थकांना यावेळी बजावले. गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आजच व त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांचीही यासंदर्भात भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button