TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

महाविकास आघाडीचे नाना काटे यांच्या विजयासाठी शरद पवार मैदानात

पिंपरी: संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील वातावरण राज्यातील दिग्गज नेत्यांच्या प्रचार दौऱ्यांनी ढवळून निघालं आहे. चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आघाडी घेतली असून महाविकास आघाडी मधील दिग्गज नेत्यांच्या सभा, बैठका, प्रचार रॅलीने चिंचवड विधानसभेत परिवर्तनाची नांदी सुरू आहे. आता नाना काटे यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बुधवारी मॅरेथॉन बैठका आयोजित केल्या आहेत.

संस्कृती लॉन्स, साई चौक, नवी सांगवी येथे सकाळी 9.30 वाजता, विमल गार्डन, रहाटणी येथे सकाळी 10.30 वाजता, कल्याण प्रतिष्ठान, सुखी भवन, केशवनगर, चिंचवडगाव येथे सकाळी 11.30 वाजता तर निवृत्ती लॉन्स, रावेत येथे दुपारी 12.30 वाजता शरद पवार यांची बैठक होणार आहे.

दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चिंचवडमध्येच तळ ठोकला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. नाना काटे यांच्या प्रचारार्थ अजित पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील, धनंजय मुंडे, भास्कर जाधव, आदित्य ठाकरे, रोहित पवार, रोहित आर.आर. पाटील अशा दिग्गज नेत्यांची फौज प्रचारासाठी उतरली होती. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्यामुळे चिंचवड मतदारसंघाचे वातावरण चांगलेच तापले आहे.

विकासकामांच्या मुद्द्यावर आणि भाजपच्या भ्रष्ट कारभाराविरोधात निवडणूक लढणाऱ्या महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जनसामान्यातून मिळणारा प्रतिसाद पाहता नाना काटे हेच या निवडणुकीत बाजी मारणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button