breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

संसदरत्न पुरस्कारासाठी १३ खासदारांना नामांकन; महाराष्ट्रातील ४ खासदारांचा समावेश

आठ लोकसभा आणि पाच राज्यसभा खासदारांचा समावेश

दिल्ली : संसदरत्न पुरस्कार २०२३ साठी देशभरातील १३ खासदारांना नामांकन जाहीर झालं आहे. आठ लोकसभा आणि पाच राज्यसभा खासदारांचा यामध्ये समावेश आहे. तर यामध्ये महाराष्ट्रातील चार लोकसभा खासदारांचा समावेश आहे.

लोकसभेतील खासदारांना नामांकन मिळालेल्या नेत्यांमध्ये भाजपचे बिद्युत बरन महतो, डॉ सुकांत मुजुमदार, काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी, कुलदीपराय शर्मा, विजयकुमार गावित, गोपाळ शेट्टी, सुधीर गुप्ता, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांचा समावेश आहे.

राज्यसभेतील खासदारांना नामांकन मिळालेल्या नेत्यांमध्ये सीपीएमचे जॉन ब्रिट्स, राजदचे मनोज झा, राष्ट्रवादीचे फौजिया खान, सपाचे विश्वंभर निषाद, काँग्रेसच्या छाया वर्मा त्याचबरोबर लोकसभेच्या वित्त समितीचे अध्यक्ष जयंत सिन्हा आणि परिवहन पर्यटन आणि सांस्कृतीक समितीचे अध्यक्ष विजयसाई रेड्डी यांच्या नावाचाही यामध्ये समावेश आहे.

केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवान यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. कृष्णमूर्ती यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरीनं या खासदरांना नामांकित केलं आहे. ज्या खासदारांना नामांकित करण्यात आलं आहे, त्यामध्ये १७व्या लोकसभेच्या सुरूवातीपासून हिवाळी अधिवेशन २०२२ च्या शेवटपर्यंतच्या संसदेत विचारण्यात आलेले प्रश्न, खासगी विधेयकं आणि त्यावरील डिबेटमधील प्रभावशाली सहभागावर आधारित असतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button