भारतीय संघाच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Shahid Afridi Viral Video : वर्ल्डकप २०२३च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. यावेळी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने लाइव्ह टीव्हीवर एक विधान केले होते. दरम्यान, शाहिद आफ्रिदीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.शाहीद आफ्रिदीने पाकिस्तानी वृत्तवाहिनी ‘समा टीव्ही’वरील चर्चेदरम्यान हे वक्तव्य केले होते.
भारतीय संघाची ११व्या षटकात श्रेयस अय्यरच्या रूपाने विकेट गेली. यावर आफ्रिदीला विचारले की, हे एखाद्या मोठ्या सामन्याचे दडपण आहे का? यावर आफ्रिदी म्हणाला, नाही, हे मोठ्या सामन्याचे दडपण नाही. त्यांच्यात आत्मविश्वास आहे. ते असेच वाढले आहेत. एवढ्या प्रेक्षकांसमोर खेळत आले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे पूर्णपणे दबावावर आधारित असते. हे त्यांना माहीत आहे. जेव्हा तुम्ही सतत सामने जिंकत असता, तेव्हा तुमचा अतिआत्मविश्वास वाढतो आणि ही गोष्ट तुम्हाला महागात पडते. कारण ज्या चेंडूंवर तो बाद झाला, तो चेंडू विकेट टाकण्यासारखा नव्हता.
हेही वाचा – राज्यात जो जातीयवाद निर्माण करतोय त्याला सरकारचं पाठबळ तर नाही ना? जरांगे पाटलांचा सवाल
India 🇮🇳 will lose this World Cup because of their overconfidence – Shahid Afridi 😳pic.twitter.com/cBlNsAjR1F
— H A M Z A 🇵🇰 (@HamzaKhan259) November 19, 2023
दरम्यान, विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय संघ अवघ्या २४० धावांवर गारद झाला. यानंतर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने लक्ष्याचा ४३ षटकांत सहज पाठलाग केला आणि ६ गडी राखून सामना जिंकला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक ट्रॉफी जिंकली.