breaking-newsपुणे

पुण्यात नवले पुलावर ब्रेक फेल झालेल्या ट्रकने ८ जणांना उडवले

पुण्यातील नवले पुलावर ब्रेक फेल झालेल्या ट्रकने आठ जणांना उडवल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. जखमींवर नवले रुग्णालयात उपचार सुरू असून यातील तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.तामिळनाडूची पासिंग असलेले ट्रक मुंबईच्या दिशेने जात होते. नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल यादरम्यान ट्रकचा ब्रेक फेल झाला. यानंतर भरधाव ट्रकने आठ जणांना उडवले. ट्रकच्या धडकेत १ दुचाकी, १ आयशर, २ कार आणि २ रिक्षांचे नुकसान झाले. जखमींपैकी एक महिला व दोन पुरुषांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. हे ट्रक नारळ घेऊन मुंबईला जात होते. या अपघातामुळे नवले पूलकडे येणाऱ्या मार्गांवर भीषण वाहतूक कोंडी झाली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button