पिंपरी / चिंचवड

गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

पिंपरी l प्रतिनिधी

गुटखा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 20) दुपारी तळेगाव-चाकण रोडवर करण्यात आली.

मोहम्मद कामीर अख्तर अली अन्सारी (वय 33, रा. खराबवाडी, ता. खेड. मूळ रा. उत्तर प्रदेश), अशोक चौधरी (रा. खराबवाडी, ता. खेड) यांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्सारी याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस नाईक विजय दौंडकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अन्सारी याने प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू व पान मसाला त्याच्या तळेगाव-चाकण रोडवर असलेल्या कैवल्य पान शॉपमध्ये विक्रीसाठी ठेवला. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 34 हजार 672 रुपयांचा गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. आरोपी अशोक चौधरी याने त्याला हा गुटखा विक्रीसाठी पुरवला असल्याने त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button