breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इंग्लंडवरून आलेल्या 268 प्रवाशांपैकी 7 जणांना कोरोना

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात आज दिवसभरात 109 कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आले. तर, आज दिवसभरात मनपा हद्दीमध्ये आणि हद्दीबाहेर एकाही मृत्युची नोंद नाही. इंग्लंडहून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या 268 प्रवाशांपैकी 7 जणांचा अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत.

शहरामध्ये आजअखेर एकूण 96 हजार 960 बाधीत रुग्णसंख्या आहे. तर, 1 हजार 759 जणांचा कोरोनाच्या प्रादुर्भावाने मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेने आज दिवसभरात 775 घरांना भेटी देऊन 2 हजार 305 नागरिकांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये 109 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

इंग्लंडहून मुंबईत विमानाद्वारे उतरून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या 268 प्रवाशांचा शोध घेण्यात आला. त्यापैकी 14 प्रवाशी भारतात परतलेले नाहीत. 50 प्रवाशी बाहेरगावी गेले आहेत. 16 प्रवाशांचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. उर्वरीत 188 प्रवाशांची चाचणी केली असून त्यापैकी 181 नकारात्मक असून 7 जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button