breaking-newsताज्या घडामोडीपुणे

खेड तालुक्यातील राजगुरूनगर, चाकण, आळंदी शहरात सांस्कृतिक सभागृह उभारा!

आम आदमी पार्टी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मयूर दौंडकर यांची मागणी

पुणे : खेड तालुक्यात आळंदी ही जुनी नगरपालिका असून महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. तसेच चाकण, राजगुरुनगर या नगरपालिका अलीकडील कालखंडात अस्तित्वात आलेल्या आहेत. चाकण औद्योगिक दृष्ट्या महत्वाचे शहर असून महत्त्वाची बाजारपेठ आहे. राजगुरुनगर हे ऐतिहासिक तसेच तालुक्याचे ठिकाण/प्रमुख शहर आहे.

खेड तालुक्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक, वारसा असून सांस्कृतिक वारसा जतन करून वृद्धिगत करण्यासाठी नागरिकांसाठी सांस्कृतिक नाट्यगृह/ सभागृह स्थापनेची गरज आहे.

या तीनही नगरपालिका क्षेत्रात सांस्कृतिक नाट्यगृह/ सभागृह प्रस्थापित झाले तर नाट्य, कला ,अभिनय, व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे व त्याचा आस्वाद घेणे शक्य होणार आहे. याशिवाय यातून स्थानिक नगरपालिकांना उत्पन्नाचे स्त्रोतही निर्माण होणार आहे. स्थानिक नगरपालिकेतील सामान्य नागरिक कर भरत असून त्यांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रमुख कर्तव्य नगरपालिकांचे आहे. यासाठी तालुक्यातील आळंदी, चाकण, खेड,नगरपालिका हद्दीत स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार/गरज म्हणून सांस्कृतिक नाट्यगृह/ सभागृह सुरू करण्यात यावे. अशी मागणी निवेदनाद्वारे तालुक्याचे नायब तहसीलदार आर.बी. बिजे यांच्याकडे आम आदमी पार्टी खेड- आळंदी विधानसभा यांच्या वतीने करण्यात आली.

हेही वाचा – ‘माझा परिवार सोडला तर बाकी माझ्या विरोधात..’; अजित पवारांचं विधान

यावेळी आम आदमी पार्टीचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मयूर मगन दौंडकर तसेच श्री. दत्तात्रय ढेरंगे, श्री. सुधीर डावरे उपस्थित होते.

खेड आळंदी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांचे जीवनमान उंचवण्यासाठी पायाभूत सुविधा पुरवणे हे शासनाचे आद्यकर्तव्य आहे. आज पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही मेट्रो सिटीलगत असणाऱ्या खेड तालुक्याची दयनीय अवस्था झालिये. कुठल्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा आज या ठिकाणी देण्यात येत नाहीयेत. आम आदमी पार्टी नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा मिळव्यात म्हणून नेहमीच झगडत राहील.

– मयुर दौंडकर, प्रदेशाध्यक्ष आम आदमी पार्टी युवा आघाडी महाराष्ट्र राज्य.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button