breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

आयपीएलच्या तेराव्या मोसमाचं उद्यापासून बिगुल वाजणार

संयुक्त अरब अमिरात…म्हणजेच यूएई. मध्यपूर्वेतील याच संपन्न देशात शनिवारपासून (19 सप्टेंबर) पुढचे जवळपास दोन महिने यंदाच्या आयपीएलचा महासोहळा रंगणार आहे.

खरंतर दरवर्षीप्रमाणे मार्च ते मेदरम्यान आयपीएल खेळवली जाणार होती. पण भारतात कोरोनाचा प्रभाव वाढला आणि ही स्पर्धा देशाबाहेर खेळवण्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यासाठी श्रीलंका, दक्षिण आफ्रिका यांसारखे पर्यायही समोर आले. पण अखेर कोरोनाचा कमीतकमी प्रभाव असलेल्या यूएईत आयपीएलच्या तेराव्या मोसमाचं आयोजन करण्याचं बीसीसीआयने पक्क केलं.

यूएईची राजधानी अबुधाबी, दुबई आणि शारजाह या तीन महत्त्वाच्या शहरांमध्ये आयपीएलचं हे युद्ध रंगणार आहे.

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

दुबईतल्या या नव्या स्टेडियमवर आयपीएलच्या 56 साखळी सामन्यांपैकी सर्वाधिक 24 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यासोबतच अंतिम सामनाही याच स्टेडियमवर खेळवण्यात येण्याची शक्यता आहे.

शेख झायेद स्टेडियम, अबुधाबी

यंदाच्या आयपीएलचा उद्घाटनाचा सामना अबुधाबीतल्या शेख झायेद स्टेडियमवर पार पडणार आहे. यासह एकूण 20 साखळी सामने या स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत.

शारजाह क्रिकेट स्टेडियम

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button