breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सॅनेटरी पॅडच्याआड प्रायव्हेट पार्टमध्ये सोनं लपवलं

कोलकाता | कोलकाता विमानतळावर सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेस गुरुवारी ताब्यात घेण्यात आलं आहे. महिलेने आपल्या शरीरामध्ये सोनं लपवून नेण्याचा प्रयत्न केला होता. विमानतळावर तैनात सीआयएसएफ (CISF) अधिकाऱ्यांनी तिला ताब्यात घेतलं. ही महिला जवळजवळ ५०० ग्रॅम सोनं घेऊन जात होती.

गुरुवारी आरोपी परवीन सुलताना अब्दुल रशीद ही बँकॉकहून कोलकाता विमानतळावर पोहोचली. जेव्हा तिची तपासणी सुरु होती तेव्हा एका अधिकाऱ्याला तिच्यावर संशय आला. त्यामुळे तपासणी व स्कॅन करताना उपनिरीक्षक रश्मी गुरुंग यांना परवीनने शरीरात सोने लपवलं असल्याचं जाणवलं.

ही शंका येताच परवीनची आणखी कसून तपासणी करण्यात आली. ज्यावेळी फ्रिस्किंग करण्यात आलं तेव्हा महिला अधिकाऱ्यांना परवीनने आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये सोनं लपवलं असल्याचं समजतं. परवीनने प्रायव्हेट पार्टमध्ये एका प्लॅस्टिकच्या पाकिटात जवळजवळ ५०० ग्राम सोन्याची पावडर लपवली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button