breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2024 लिलावासाठी ११६६ खेळाडूंनी नोंदवली नावे; ‘या’ खेळाडूंची मूळ किंमत २ कोटी

IPL 2024 : आयपीएलचा लिलाव १९ डिसेंबरला होणार आहे. या लिलावासाठी एकूण ११६६ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. ११६६ खेळाडूंपैकी ८३० खेळाडू भारतीय आहेत. तर ३३६ परदेशी खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. एकूण २१२ कॅप्ड, ९०९ अनकॅप्ड आणि ४५ सहयोगी देशांचे खेळाडू आहेत. यामध्ये रचिन रवींद्र, ट्रॅव्हिस हेड यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, हर्षल पटेल, केदार जाधव, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव या भारतीय खेळाडूंची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे. उर्वरित १४ कॅप्ड भारतीय खेळाडूंची मूळ किंमत ५० लाख रुपये आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, सीन अॅबॉट, जोश इंग्लिस आणि स्टीव्ह स्मिथ यांनी त्यांची मूळ किंमत २ कोटी रुपये ठेवली आहे.

२ कोटी मूळ किंमत असलेले खेळाडू

हर्षल पटेल, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केदार जाधव, मुजीब उर रहमान, शॉन अॅबॉट, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ, मुस्तफिजूर रहमान, टॉम बॅंटन, हॅरी ब्रूक, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, लॉकी फर्ग्युसन, जेराल्ड कोएत्झी, रिले रॉसौ, रॅसी व्हॅन डर डुसेन, अँजेलो मॅथ्यूज.

हेही वाचा  –  अवकाळी संकट! ‘या’ दिवशी धडकणार ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळ 

१.५ कोटी मूळ किंमत असलेले खेळाडू

मोहम्मद नबी, मॉइसेस हेन्रिक्स, ख्रिस लिन, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, डॅनियल वॉरॉल, टॉम कुरन, मर्चंट डी लँग, ख्रिस जॉर्डन, डेविड मलान, टायमल मिल्स, फिल सॉल्ट, कोरी अँडरसन, कॉलिन मुनरो, जिमी नीशम, टीम साउदी, कॉलिन इंग्राम, वानिंदू हसरंगा, जेसन होल्डर, शेरफेन रदरफोर्ड.

१ कोटी मूळ किंमत असलेले खेळाडू

अॅश्टन आगर, रिले मेरेडिथ, डी’आर्सी शॉर्ट, अॅश्टन टर्नर, गुस ऍटकिन्सन, सॅम बिलिंग्स, मायकेल ब्रेसवेल, मार्टिन गुप्टिल, काइल जेमिसन, अॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, अल्झारी जोसेफ, रोव्हमन पॉवेल, डेव्हिड विस.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button