TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडराजकारणराष्ट्रिय

भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा पार केलेल्या भाजपला धडा शिकवा : राहुल कलाटे

पिंपरी : भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या भाजपाने पिंपरी चिंचवड महापालिका चाटून पुसून खाल्ली असा आरोप चिंचवड मतदार संघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी केला आहे . भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा पार केलेल्या भाजपाला मतदारांनी धडा शिकवावा असे आवाहनही त्यांनी केले आहे

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष म्हणून शिट्टी या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरलेल्या कलाटे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. कलाटे यांनी म्हटले आहे की, महापालिकेत त्यावेळी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले. स्वच्छ कारभाराचे वचन देऊन पालिकेत सत्ता मिळवली. मात्र टेंडरवरच अधिक खर्च करण्यात आणि पदाधिकारी पोसून टक्केवारी गोळा करण्यात भाजपला रस होता. गेल्या पाच वर्षात टेंडरवरच अधिक खर्च झाला .मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यात महापालिकेतील सत्ताधारी भाजपला अपयश आले. शहरवासीयांना 24 तास पाणी देण्याची घोषणा केली गेली. मात्र दिवसाआड पाणी तेही अनेक भागात कमी दाबाने मिळत आहे.

टँकर लॉबी जोरात आहे. भामा आसखेड व आंध्रा धरणातून पाणी आणण्याच्या योजनेत भ्रष्टाचार झाला. जॅकवेल प्रकरणात भाजपामधील दोन गट आमने-सामने आले. जॅकवेल प्रकरणात 30 कोटींचा घोटाळा झाल्याची चर्चा झाली. यात जनतेच्या पदरात मात्र काहीच पडले नाही.वैद्यकीय सुविधांबाबत आनंदी आनंद आहे थेरगाव व आकुर्डी रुग्णालयाचे आउटसोर्सिंग केले गेले. संत तुकाराम नगर येथील नेत्र रुग्णालय झाले नाही. डॉक्टर भरतीत घोटाळा झाला.कचरा ,आरोग्य विभागात ठेकेदार पोसण्याचे काम केले गेले. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प ,केबलिंग ,ड्रेनेज पाईपलाईन घोटाळा ,शिक्षक भरती घोटाळा याची चर्चा झाली . बेकायदा होर्डिंग काढण्याचे कंत्राट व कुत्र्यावर नसबंदी करण्याचे कंत्राट भाजप पदाधिकाऱ्यांना दिले गेले .त्यातही भ्रष्टाचार झाला असा आरोप कलाटे यांनी केला आहे.

एका प्रकरणात ठेकेदारांनी बोगस कागदपत्रे देऊन कंत्राटे मिळवल्याचे उघड झाले . मात्र सत्ताधारी भाजपने त्यांना पाठीशी घातले.कोरोना संकट काळात मास्क पासून व्हेंटिलेटर ,रुग्णांचे जेवण, नाश्ता यातही भ्रष्टाचार झाला. सर्वात लाज आणणारी गोष्ट म्हणजे स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष ऍड.नितीन लांडगे आणि महापालिकेच्या चार कर्मचाऱ्यांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली. वर्क ऑर्डर मिळविण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठी एक लाख 18 हजारांची लाच स्वीकारताना पालिका स्थायी समितीच्या कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पालिका मुख्यालयातच रंगेहात पकडले .स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष ऍड.नितीन लांडगे, त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे (मुख्य लिपिक) विजय चावरिया (लिपिक) राजेंद्र शिंदे( संगणक ऑपरेटर) आणि अरविंद कांबळे( शिपाई) यांना पोलिसांनी अटक केली. एसीबीच्या कारवाईनंतर भाजप नेते ऍड. लांडगे यांचा राजीनामा घेतील अशी शहरवासीयांना अपेक्षा होती .मात्र घडले उलटेच .जामीनावर सुटका अन न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना लांडगे यांनी स्थायी समितीची सभा घेतली कोट्यावधीच्या कामांना मंजुरी दिली .त्यामुळे पारदर्शक कारभाराची घोषणा केलेल्या भाजपचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे जनतेसमोर आले. म्हणूनच भ्रष्टाचाराच्या अशा सर्व सीमा पार केलेल्या भ्रष्टाचारी भाजपला धडा शिकवण्यासाठी मतदारांनी चिंचवड मतदार संघातून मला विजयी करावे असे आवाहन कलाटे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button