ताज्या घडामोडीमुंबई

युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी रशियाची तात्पुरती युद्धबंदी

कीव | युक्रेनच्या मारियुपोल आणि ओल्नोवाखा या दोन शहरांमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी रशियाने मॉस्को वेळेनुसार आज सकाळी १० वाजल्यापासून काही तासांची एकतर्फी युद्धबंदी केली आहे, अशी माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. यामुळे युक्रेनच्या युद्धग्रस्त भागात अडकलेल्या ३ हजार भारतीय विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. युद्धबंदीमुळे त्यांच्या सुटकेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

युक्रेनच्या युद्धग्रस्त भागात अनेक नागरिक अडकले आहेत. त्यात भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. त्यांच्या सुटकेसाठी भारताने रशिया आणि युक्रेनला शस्त्रसंधीचे आवाहन केले होते. त्यानंतर रशियाने युक्रेनच्या स्थानिक वेळेनुसार आज सकाळी ६ वाजल्यापासून एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली. युक्रेनच्या युद्धग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी रशियाने हा निर्णय घेतला. मारियुपोल आणि वोल्नोवाखा या २ शहरांमध्ये ही शस्त्रसंधी लागू केली आहे.

रशियाच्या या निर्णयामुळे भारतीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील शांतता चर्चेच्या २ फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. त्यानंतर आज किंवा उद्या चर्चेची तिसरी फेरी होण्याची शक्यता आहे. मॉस्कोतील स्थानिक वेळेनुसार आज सकाळी १० वाजल्यापासून रशियाने शस्त्रसंधीची घोषणा केली. मानवी दृष्टिकोनातून नागरिकांना आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या ३ हजार भारतीयांची सुटका करून त्यांना मायदेशी परत आणणे शक्य होणार आहे. खारकीव आणि सुमी या पूर्व युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात हल्ले आणि गोळीबार सुरू आहे. त्यामुळे भारतीयांच्या सुटकेत अडचणी येत आहेत. युक्रेनच्या युद्धग्रस्त भागात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी युद्धविराम करण्याचे आवाहन भारताने रशिया आणि युक्रेनला केले होते. त्यानंतर रशियाने आज एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली. युक्रेनच्या खारकीव आणि सुमी या भागातून भारतीयांना रशियाच्या बेल्गोर्ड शहरात नेण्यासाठी १३० बसची व्यवस्था करण्याची तयारी रशियाने दाखवली आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button