breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात भरणार भव्य मोरया युथ फेस्टिव्हल

  • ॲड. सचिन पटवर्धन यांची माहिती
  • तरुणाईच्या कलागुणांना मिळणार वाव

पिंपरी, (महा ई न्यूज) – पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षण, कला, क्रिडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण या क्षेत्रात सामाजिक उपक्रम राबविणारी कर्तव्य फाऊंडेशन ही अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेच्या वतीने शहरातील युवक युवतींना सांस्कृतिक, कला व क्रिडा क्षेत्रात आपल्यातील गुण कौशल्य सादर करण्यासाठी ‘मोरया युथ फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष व राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली.

जानेवारी 2019 च्या पहिल्या आठवड्‌यात या फेस्टिव्हलचे उद्‌घाटन व समारोप भव्य प्रमाणात करण्यात येणार आहे. शहरातील शंभरहून जास्त महाविद्यालये या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होतील. या फेस्टिव्हल अंतर्गत शहरातील शंभरहून जास्त महाविद्यालयात नृत्य स्पर्धा, कॅरम, बुद्धीबळ, छायाचित्रण, वक्तृत्व, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, टेबल टेनिस, क्रिकेट, रांगोळी, मेहंदी आणि ऑन द स्पॉट पेंटींग अशा वैयक्तिक व सांघिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. प्रत्येक स्पर्धेच्या विजेत्यास समारोप कार्यक्रमात आकर्षक बक्षीसे देऊन गौरविण्यात येईल, असा विश्वास ॲड. सचिन पटवर्धन यांनी व्यक्त केला.

या फेस्टिव्हलअंतर्गत ‘लोगो’ स्पर्धेची घोषणा आज ॲड. पटवर्धन यांनी केली. या स्पर्धांसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, हौसी, व्यावसायिक डिझायनर यांनी बनविलेला ‘लोगो’ वापरण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी 21 ऑक्टोबर 2018 पर्यंत आपले डिझाईन [email protected] या ईमेलवर पाठवावेत. सर्वोत्कृष्ट डिझाईनरला फेस्टिव्हलच्या उद्‌घाटन समारंभात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. तसेच युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी स्पर्धा परिक्षेची तयारी, आरोग्याचे महत्व, उद्योग व्यवसायातील संधी, व्यवसाय सुरु करण्यासाठी शासकीय, वित्तीय संस्थांचे मार्गदर्शन, उच्च शिक्षणासाठी देशात व परदेशातील संधी या विषयी सहाय्य व मार्गदर्शन, महिलांचे हक्क, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील संधी अशा विविध विषयांवर ज्येष्ठ मान्यवरांची व्याख्याने व मार्गदर्शन शिबिरे फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहेत. मोरया युथ फेस्टिव्हल अंतर्गत घेण्यात येणा-या सर्व स्पर्धांचे वेळापत्रक व इतर माहिती महाविद्यालयात वेळोवेळी देण्यात येईल. या फेस्टिव्हलमध्ये जास्तीत महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असेही आवाहन ॲड. सचिन पटवर्धन यांनी केले.

यावेळी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक बाबू नायर, युवा कामगार नेते इरफान सय्यद, जयहिंद हायस्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योतिका मलकानी, प्रा. शिल्पागौरी गणपुले, उद्योजक चेतन फेंगसे, ज्येष्ठ सांस्कृतिक कलाकार किरण येवलेकर, फोर्ब्स मार्शल कंपनीचे बिझनेस हेड राजेश पाटील आदी उपस्थित होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button