ताज्या घडामोडीमुंबई

राज ठाकरेंविषयी अपशब्द वापरले; मनसैनिकांनी वसईत एकाला चोपले

वसई | मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्याला वसईत मनसैनिकांनी भररस्त्यात चोपले. त्याचे कपडे काढून धिंड काढली. हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर व्हायरल करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

कल्याणमधील महिलेने वसईत डेटाएंट्रीचे काम घेतले होते. त्यात कंपनीने १,२०० रुपये घेऊन तिला प्रोजेक्ट दिला होता. ७ दिवसांनी तिने काम पूर्ण करून कंपनीला दिले. मात्र कंपनीच्या कर्मचाऱ्याने तुमच्या कामात खूप चुका आहेत, असे सांगून पैसे देण्यास नकार दिला. काम करून आणि चुका नसतानाही कंपनी पैसे देत नसल्यामुळे ही महिला संतापली. तिने कंपनीत जाऊन पैशांची मागणी केली. परंतु त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा मी तुमची तक्रार मनसेकडे करीन, असे या महिलेने कंपनीच्या कर्मचाऱ्याला सांगितले. त्यावर त्यांनी महिलेला शिविगाळ केली आणि राज ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरले. हा प्रकार वसईतील मनसेच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी कंपनीच्या या कर्मचाऱ्याला भररस्त्यात चोपले. त्याची धिंड काढली. नंतर माणिकपूर पोलिसांच्या ताब्यात दिले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button