breaking-newsTOP Newsपश्चिम महाराष्ट्रपुणेमुंबईराजकारण

ज्यांना स्वत:ला विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही ते बारामती जिंकणार होय- रुपाली पाटील

रुपाली पाटलांकडून बावनकुळेंचा किमान शब्दात कमाल अपमान, ‘ज्याला तिकीट मिळालं नाही तो…

पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । 

लोकसभेसाठीच्या ‘मिशन बारामती’ दौऱ्यावर असलेल्या भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटलांनी किमान शब्दात कमाल अपमान केला आहे. ज्यांना स्वत:ला विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही ते बारामती जिंकणार होय, अशा शब्दात रुपाली पाटलांनी भाजपच्या मिशन बारामतीची खिल्ली उडवली आहे. संघटन बांधणी आणि केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज बावनकुळे बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. भाजपच्या ‘मिशन बारामती’ला आजपासून सुरुवात झाली आहे. भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज बारामती दौऱ्यावर आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवार कुटुंबियांच्या प्रचाराचा नारळ ज्या कन्हेरीच्या हनुमान मंदिरात फुटतो, त्याच मंदिरात जाऊन चंद्रशेखर बावनकुळे यांनी बजरंगबलीचा आशीर्वाद घेतला. तिथून त्यांनी काटेवाडीत बुथ क्रमांक २१८ चा आढावा घेतला.

रुपाली पाटलांकडून बावनकुळेंचा किमान शब्दात कमाल अपमान
जेव्हा संघटन मजबूत होते तेव्हा संघर्ष करण्याची ताकद निर्माण होते, त्यानंतर मात्र चांगले-चांगले गड उद्ध्वस्त होतात, हा देशाचा इतिहास आहे. गड हा कोणाचा नसतो, जनतेने तो बनविलेला असतो त्यामुळे जनताच देश हितासाठी बदल करते असे म्हणत पवारांच्या बालेकिल्ल्यात थेट २०२४ निवडणुकांचे रणशिंग फुंकलं आहे. बावनकुळेंच्या निर्धारानंतर रुपाली पाटील यांनी एक फेसबुक पोस्ट केलीय. ज्यात त्या म्हणतात, स्वत:ला पक्षात उमेदवारी मिळेना अन् बारामती जिंकणार म्हणे…, अशा शब्दात त्यांनी बावनकुळेंचा पाणउतारा केला तर भाजपच्या मिशन बारामतीची खिल्ली उडवली.

भाजपचं मिशन बारामती!
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने आतापासूनच सुरु केली आहे. प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून बावनकुळे यांचा पुणे जिल्ह्यात पहिला दौरा आहे, तोही थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कर्मभूमी बारामतीत. भाजपने लोकसभा निवडणूक २०२४ साठी ‘मिशन ४५’ आखलं आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ताब्यातील जागा हिसकावून घेण्यासंबंधीचं प्लॅनिंग भाजपने केलं आहे. त्यानुसार आतापासूनच भाजपने तयारी सुरु केली आहे. येत्या २२ ते २४ सप्टेंबरदरम्यान देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देखील बारामती दौऱ्यावर येत आहे. त्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी आज बावनकुळे विशेष बैठक घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button