breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रियव्यापार

शेअर बाजारात ऐतिहासिक तेजी; सेन्सेक्स पहिल्यांदाच 50 हजारांवर

मुंबई – अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या शपथविधीनंतर आज शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्सने 50 हजारांचा ऐतिहासिक आकडा पार करत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 50079.50 वर तर निफ्टी 14729.30 वर होता. त्यामुळे बाजारात उत्साह दिसून येत असून ही बाब गुंतवणूकदारांसाठी चांगली आहे.

बायडेन राष्ट्रपती झाल्यानंतर अमेरिकन बाजारपेठेत चांगली तेजी आल्यामुळे भारतीय बाजारही त्याचा चांगला परिणाम दिसून आला. सेन्सेक्स पॅकमध्ये आज बजाज फायनान्स, बजाज फिनझर्व्ह, एचसीएल टेक, बजाज ऑटो, टायटन, आरआयएल, टेक महिंद्रा, कोटक बँक, इंडसइंड बँक, एशियन पेंट, अ‍ॅक्सिस बँक आणि डॉ. रेड्डी यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. यांचे शेअर 2.61 टक्क्यांपर्यंत वाढले. तर दुसरीकडे टीसीएस, एचडीएफसी, एचडीएफसी बँक आणि नेस्ले यांच्या शेअरमध्ये 0.33 टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button