breaking-newsटेक -तंत्र

Royal enfield लॉन्च करणार 250cc इंजिनची नवी बाईक

नवी दिल्ली : आपल्या दमदार बाईक्ससाठी ओळखली जाणारी Royal Enfield आता स्वस्त बाईक तयार करण्यासाठी काम करत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी एक 250cc इंजिन असणारी बाईक तयार करत आहे. तसेच काही मीडिया रिपोर्ट्समध्येही या बाईकबाबत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, अद्याप कंपनीने या बाईकबाबत कोणतीच माहिती दिलेली नाही. परंतु, कंपनीच्या दोन मोठ्या अधिकाऱ्यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले की, कंपनी 14 नव्या बाईक्स मार्केटमध्ये दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

Royal Enfield च्या 250cc बाईकचा थेट सामना Bajaj Dominar 250, BS6 Yamaha FZ25 आणि Husqvarna Svartpilen 250 यांसारख्या बाईक्सशी होणार असल्याचं बोललं जात आहे. एवढचं नाहीतर सुत्रांच्या माहितीनुसार, Royal Enfield ची 250cc इंजिन असणाऱ्या बाईकची किंमत एक लाख रूपये असू शकते. या बाईक व्यतिरिक्त कंपनी हिमालयनचं नवं व्हेरियंट आणि एक रोडस्टर बाईकही घेऊन येण्याच्या तयारीत आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button